आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राज्ये/केंद्रशासित प्रदेशात उपलब्ध कोविड-19 लसींच्या उपलब्धतेची अद्ययावत माहिती


राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांना 164 कोटी 89 लाखांपेक्षा जास्त लसींच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या

11 कोटी 48 लाखांहून अधिक न वापरलेल्या लसीच्या मात्रांचा साठा अजूनही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध

Posted On: 02 FEB 2022 9:08AM by PIB Mumbai

देशभरात कोविड -19 लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे. देशव्यापी कोविड- 19 लसीकरण मोहिमेची सुरवात 16 जानेवारी 2021 रोजी झाली. कोविड- 19 लसीकरणाच्या या मोहिमेचा दुसरा देशव्यापी टप्पा 21 जून 2021 रोजी सुरु झाला. अधिकाधिक लसींची उपलब्धता करून, भविष्यातील लसींची गरज लक्षात घेता राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अधिक चांगले नियोजन करता यावे यासाठी लसींचा पुरवठा सुनिश्चित करून आणि लस पुरवठा साखळी सुरळीत करून लसीकरण मोहीमेचा वेग वाढविण्यात आला.

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून, भारत सरकार राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मोफत लस पुरवठा करून मदत करत आहे. देशव्यापी कोविड-19 लसीकरणाच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून देशात बनविल्या जाणाऱ्या लसींपैकी 75% लसी अधिग्रहित करून त्यांचे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मोफत वाटप करत आहे.

 

VACCINE DOSES

 

(As on 2ndFebruary 2022)

 

SUPPLIED

 

1,64,89,60,315

 

BALANCE AVAILABLE

 

 

11,48,99,956

 

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 164 कोटी 89 लाखांहून (1,64,89,60,315) अधिक मात्रा मोफत पुरविल्या आहेत.

11 कोटी 48 लाखांहून (11,48,99,956) जास्त कोविड लसीच्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

 ***

SamarjeetT/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1794656) Visitor Counter : 205