नौवहन मंत्रालय
सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील हरित बंदरे आणि हरित नौवहनाच्या विकासासाठी हाती घेतलेल्या हरित उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला
केंद्रीय मंत्र्यांनी जेएनपीटीच्या हरित प्रकल्प उपक्रमांचाही आढावा घेतला
Posted On:
29 JAN 2022 10:16PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे,नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख बंदरे, कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) आणि भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण (Inland waterways Authority of India) यांच्यासोबत मेरिटाइम इंडिया व्हिजन (MIV) 2030 नुसार राबवण्यात येत असलेल्या विविध हरित उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी ) च्या अनेक हरित प्रकल्प उपक्रमांचाही आढावा घेतला. जेएनपीटीचे ग्रीन पोर्ट उपक्रम अधोरेखित करताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी,आयएएस म्हणाले, “जेएनपीटीने सर्व बंदर कामकाजांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार केला आहे, ज्यात कार्गो हाताळणी, साठवणूक , स्थलांतर आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित इतर अनेककामांचा समावेश आहे. जेएनपीटी टग्स आणि पोर्ट क्राफ्ट्सना किना-यावर वीज पुरवठा, ई-आरटीजीसीचा समावेश आणि इतर अनेक उपक्रम राबवते. जेएनपीटीने इंडक्टेड इलेक्ट्रिक वाहनांवर सौर पॅनेल बसवले आहेत.
जवाहरलाल नेहरू बंदर शाश्वत विकासासाठी वचनबद्ध आहे आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करत आहे. जेएनपीटीकडे एकूण सुमारे 3402 हेक्टर जमीन उपलब्ध आहे, त्यापैकी 1147 हेक्टर क्षेत्र (34%) हरित क्षेत्र आहे, त्यात खारफुटीचा समावेश आहे. बंदराच्या परिसंस्थेत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वनस्पती आणि प्राणी आहेत. बंदर स्तरावर जागतिक हवामान बदलाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, बंदराने “हरित बंदर दर्जा” मिळवण्यासाठी उपक्रम हाती घेतले आहेत.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793557)
Visitor Counter : 216