अर्थ मंत्रालय
मुंबई सीमाशुल्क क्षेत्र- II कार्यालयात आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन साजरा
Posted On:
27 JAN 2022 9:05PM by PIB Mumbai
मुंबई, 27 जानेवारी 2022
मुंबई मुंबई सीमाशुल्क क्षेत्र- II कार्यालय, न्हावा शेवा यांनी आज आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन साजरा केला. “डेटा संस्कृतीचा अंगीकार करत, सीमाशुल्क क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाला चालना देणे आणि डेटा व्यवस्था विकसित करणे” ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनाची संकल्पना होती.
आभासी पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात व्यापार सुलभता, कोविड संकटात करण्यात आलेल्या उपाययोजना आणि माहिती तंत्रज्ञान आधारीत इतर निर्णयांवर व्यापक चर्चा करण्यात आली. भागधारकांकडून नवीन प्रणालींविषयी मते जाणून घेण्यात आली.
डेटा संस्कृतीचा अंगीकार करत, सीमाशुल्क क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाला चालना देणे आणि डेटा व्यवस्था विकसित करणे” या विषयावर अधिकाऱ्यांमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई सीमाशुल्क क्षेत्र- II कार्यालयाने आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषेला चांगला प्रतिसाद मिळाला.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793087)
Visitor Counter : 220