अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई सीमाशुल्क क्षेत्र-1 कार्यालयात आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन साजरा


सीबीआयसी ने सुरु केलेल्या विविध सुविधांचे व्यापारी भागीदार/हितसंबंधीयांकडून स्वागत

Posted On: 27 JAN 2022 8:53PM by PIB Mumbai

मुंबई, 27 जानेवारी 2022

मुंबई सीमाशुल्क क्षेत्रीय कार्यालय-झोन वन मध्ये आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस साजरा करण्यात आला.  सीमाशुल्क विभागाचे मुख्य आयुक्त प्रमोद कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली न्यू कस्टम हाऊस इथल्या कार्यालयात, हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

प्रधान आयुक्त सुनील जैन यांनी यावेळी सीमाशुल्क दिनाची संकल्पना, डेटा संस्कृतीचा अंगीकार करत, सीमाशुल्क क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाला चालना देणे आणि डेटा व्यवस्था विकसित करणे सांगत तिचे महत्त्व अधोरेखित केले. सीमाशुल्क विभागातील परिवर्तनाचे उत्तम विश्लेषणपूर्ण अध्ययन, डिजिटलीकरण आणि निर्वेध तसेच व्यापराविषयक अधिक पारदर्शक दृष्टिकोन याविषयीचे सादरीकरण या कार्यक्रमात झाले. व्यापार सुविधेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करुन घेण्यासाठी सीमाशुल्क विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. व्यापार सुविधेसाठी एकल खिडकी इंटरफेस व्यवस्था- स्वीफ्ट मुळे अधिक जलद आणि एकसमान पद्धतीने माल मोकळा होण्याची सोय झाली आहे. एडवांस्ड अॅनालीस्टीक व्यवस्थेमुळे कर संकलनाची व्याप्ती वाढवणे आणि डेटा-प्राणित धोरण निर्मिती शक्य झाली आहे. तुरंत सुविधा केंद्रामुळे निर्वेध व्यापार सुविधा आणि चौकशी व्यवस्था शक्य झाली आहे.

बृहन्मुंबई सीमाशुल्क मध्यस्थ (ब्रोकर) संघटनेचे अध्यक्ष किरण रांभिया आणि उपाध्यक्ष दुष्यंत मुलाणी यांनी सीबीआयसी ने सुरु केलेल्या विविध सुविधांचे स्वागत केले. विशेषतः गेल्या दोन वर्षात, कोविड महामारीच्या काळात सुरु झालेल्या सुविधा, जसे की ऑक्सीजन सिलेंडर सारखे मदत साहित्य मोकळे करण्याची चोवीस तास सुविधा इत्यादि. अखिल भारतीय द्रव साहित्य आयातदार आणि निर्यातदार संघटनेचे (AILBIEA) जयंत लापसिया यांनीही व्यापार सुलभ दृष्टिकोन आणि पारदर्शक प्रशासनव्यवस्थेची तारीफ केली. अनेक अडथळे आणि प्रश्न, जीवितहानी आणि कोविड महामारी असतांनाही सीमाशुल्क विभागाने आपले काम 100 टक्के कार्यक्षमतेने पूर्ण केले, असेही त्यांनी सांगितले. डिजितलीकरणातून, बनावट आयातदार पकडले जातील, आणि सुविधांचे लाभ जास्तीत जास्त प्रमाणात लाभ खऱ्या आयातदारांना मिळू शकतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती त्यांनी केली.

मुख्य आयुक्त प्रमोद कुमार अग्रवाल यांनी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिनाच्या निमित्त सर्व अधिकारी आणि व्यापारी सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच डेटा संस्कृतीच्या महत्वावर भर दिला. सीमाशुल्क विभागात, डिजिटल परिवर्तन आणण्याला प्राधान्य द्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. चेहराविरहित, संपर्कविरहित तसेच कागदरहित प्रक्रियांची सुविधा व्यवस्था अधिक व्यापक करण्याच्या मानसिकतेने काम करावे, यासाठी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

तसेच, झोन-वन च्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवा आणि कार्यासाठी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रेही देण्यात आली.

कोविड-19 मुळे असलेले प्रतिबंधात्मक नियम आणि प्रोटोकॉल मुळे, हा कार्यक्रम वेब प्लॅटफॉर्म वरुन थेट दाखवण्यात आला. तसेच, व्यापारी भागीदार/ हितसंबंधियांचे प्रतिनिधी आणि मुंबई सीमाशुल्क विभागाचे कर्मचारी, आभासी माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस दरवर्षी 26 जानेवारी रोजी जगभर साजरा केला जातो. 26 जानेवारी 1953 साली ब्रसेल्स इथे 17 सदस्य देशांच्या उपस्थितीत, झालेल्या सीमाशुल्क सहकार्य परिषदेच्या उद्‌घाटन सत्राची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या संमेलनात, स्थापन झालेल्या परिषदेच्या करारावर 15 डिसेंबर 1950 रोजी स्वाक्षरी झाली. 1994 सालीसीमाशुल्क सहकार्य परिषदेचे नवे नामकरण झाले- जागतिक सीमाशुल्क संघटना (WCO)’. दरवर्षी 26 जानेवारीला या संघटनेचे सदस्य देश, एक संकल्पना घेऊन हा दिवस साजरा करतात.

 

 

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1793084) Visitor Counter : 236


Read this release in: English