अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई सेंट्रल सीजीएसटी आयुक्तालयाद्वारे 234 कोटींच्या बोगस बिल रॅकेटचा पर्दाफाश

Posted On: 25 JAN 2022 10:31PM by PIB Mumbai

मुंबई, 25 जानेवारी 2022

 

मुंबई झोनच्या मुंबई सेंट्रल सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) रॅकेटचा पर्दाफाश केला आहे ज्यामध्ये रु. 234 कोटींची बोगस बिले आणि रु 41 कोटी च्या बनावट आयटीसीचा समावेश आहे. आणि धातूच्या व्यापारात गुंतलेल्या एका व्यावसायिकाला अटक केली.

सेंट्रल इंटेलिजेंस युनिट, मुंबई सीजीएसटी झोनकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, अधिकाऱ्यांनी मशीद बंदर द्वारे आधारित दोन कंपन्यांविरुद्ध, जय विनायक इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स जय विनायक मेटल कॉर्पोरेशन या कंपन्यां विरुद्ध तपास सुरू केला. त्यांचे मालक आणि संचालक यांच्या व्यावसायिक परिसर आणि निवासस्थानावर झडती घेण्यात आली. एका फर्मचा मालक आणि दुसर्‍या कंपनीत संचालक असलेला व्यापारी 40 संस्थांकडून बनावट आयटीसी मिळवण्यात गुंतला होता आणि मालाचा प्रत्यक्ष पुरवठा किंवा पावती न देता हा आयटीसी विविध संस्थांना देत होता.

तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारे आणि व्यावसायिकाच्या कबुलीजबाबाच्या आधारे, त्याला सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 नुसार 25.01.2022 रोजी अटक करण्यात आली आणि माननीय सीएमएम न्यायालय, मुंबईसमोर हजर करण्यात आले. आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

हे ऑपरेशन सीजीएसटी मुंबई झोनने बनावट आयटीसी नेटवर्कचे उच्चाटन करण्यासाठी आणि जीएसटी कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या विशेष कर चुकवेगिरी मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमे दरम्यान मुंबई मध्यवर्ती आयुक्तालयाने आतापर्यंत 30 कोटी रुपयांची कर चोरी वसूल केलेली आहे आणि 12 जणांना अटक केलेली आहे.

PIBMum/CGST/MC/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1792693) Visitor Counter : 141


Read this release in: English