युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रायगडमधील केव्ही ओएनजीसी पनवेल, मुंबई शहरातील क्वीन मेरी स्कूल आणि महाराष्ट्रातील पीजी गरोडिया स्कूल, फिट इंडिया प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अव्वल

Posted On: 25 JAN 2022 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

क्रीडा आणि फिटनेस क्विज या विद्यार्थ्यांसाठीच्या भारतातील सर्वात मोठ्या पहिल्या-वहिल्या फिट इंडिया स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल आज जाहीर झाले. यात कोणत्या शाळा आणि विद्यार्थ्यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला आहे हे पाहुया. केंद्रीय विद्यालय ओएनजीसी नवेलचा हर्षित आनंद प्राथमिक फेरीत पहिला, तर क्वीन मेरी स्कूलच्या तरुषी मित्तलने दुसरा क्रमांक पटकावला. प्राथमिक फेरीत पात्र ठरलेल्या इतर शाळा पुढीलप्रमाणे आहेत:

कोल्हापूर

छत्रपती शाहू विद्यालय

नांदेड

ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल

पुणे

केंद्रीय विद्यालय 9बीआरडी एएफएस पुणे

मुंबई शहर

जीडी सोमानी मेमोरियल स्कूल

नागपूर

रिलायन्स फाउंडेशन स्कूल मौदा

 

राष्ट्रीय अव्वल स्पर्धक किंवा प्राथमिक फेऱ्या या उत्तर प्रदेशातून आहेत. दिल्ली पब्लिक स्कूल, ग्रेटर नोएडाच्या दिव्यांशु चमोलीने अव्वल स्थान पटकावले, तर सनबीम स्कूल, लाहरतारा, वाराणसीच्या शाश्वत मिश्रा दुसऱ्या स्थानी राहिला.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या फिट इंडिया क्विझच्या प्राथमिक फेरीत देशभरातील 626 हून अधिक जिल्ह्यांतील 13,502 शाळांमधून स्पर्धक सहभागी झाले होते.

त्यापैकी 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 361 शाळांचे विद्यार्थी आता राज्यफेऱ्यांसाठी निवडले गेले आहेत.  स्पर्धेसाठी 3.25 कोटींची बक्षीस राशी आहे विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्यांना ती स्पर्धेच्या विविध टप्प्यांवर दिली जाईल.

आयआयटी आणि जेईई प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित केली गेली होती.  प्राथमिक फेरीतील अव्वल स्पर्धक राज्य फेरीत प्रवेश करतील आणि आपापल्या राज्यांचे विजेते होण्यासाठी स्पर्धा करतील.

36 शालेय संघ (प्रत्येक राज्य आणि/किंवा केंद्रशासित प्रदेशातील विजेते) नंतर या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्रीय फेरीत जातील. याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स आणि विविध सोशल मीडिया वाहिन्यांवर केले जाईल.

प्रत्येक स्तरावरील स्पर्धेच्या विजेत्यांना रोख बक्षिसे (शाळा तसेच दोन सहभागी) आणि भारताचा पहिला फिट इंडिया राज्य/राष्ट्रीय स्तरावरील क्विझ चॅम्पियन म्हणून सन्मानित करण्यात येईल.

भारताच्या समृद्ध क्रीडा इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि भारताच्या शतकानुशतके जुन्या देशी खेळांबद्दल आणि आपल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक क्रीडा नायकांबद्दल त्यांना अधिक माहिती देणे हा या प्रश्नमंजुषेचा मुख्य उद्देश आहे.

 

 

 

 

M.Chopade/V.Ghode/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1792572) Visitor Counter : 191


Read this release in: English