युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या प्राथमिक फेरीत भारतीय विद्या भवन, नेव्ही स्कूल आणि गोव्याचे मनोविकास इंग्लिश मीडियम स्कूल अव्वल
Posted On:
25 JAN 2022 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/गोवा 25 जानेवारी 2022
विद्यार्थ्यांसाठी भारतातील सर्वात मोठी क्रीडा आणि फिटनेस प्रश्नमंजुषा या पहिल्या-वहिल्या फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या प्राथमिक फेरीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. प्राथमिक फेरीत दक्षिण गोवा जिल्ह्यातील भारतीय विद्या भवनच्या नारायण बांदेकर शाळेच्या साहिल सचिन शेट्टीने प्रथम तर नेव्ही चिल्ड्रन स्कूलच्या झियान चरानिया याने दुसरा आणि दक्षिण गोव्यातील मनोविकास इंग्रजी माध्यम शाळेच्या नादिया निकोल सोरेस सौझा हिने तिसरा क्रमांक पटकावला.
प्राथमिक फेरीत पात्र ठरलेल्या इतर शाळांमध्ये मदर ऑफ मर्सी इंग्लिश हायस्कूल, सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट, अवर लेडी ऑफ पर्पेच्युअल सकर कॉन्व्हेंट हायस्कूल, सेंट थेरेझा कॉन्व्हेंट हायस्कूल आणि श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय बिचोलिम गोवा यांचा समावेश आहे.
प्राथमिक फेरीतील राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरलेले स्पर्धक उत्तर प्रदेशातील आहेत. ग्रेटर नोएडामधील दिल्ली पब्लिक स्कूलच्या दिव्यांशु चमोलीने अव्वल स्थान पटकावले, तर वाराणसीच्या लाहरतारा येथील सनबीम स्कूलच्या शाश्वत मिश्रा दुसऱ्या स्थानी राहिला. त्यापैकी 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 361 शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड आता आता राज्य फेरीसाठी करण्यात आली आहे.
प्रश्नमंजुषेतील विजेत्यांच्या बक्षिसाची रक्कम आहे. 3.25 कोटी रुपये आहे. विजेत्या शाळांना आणि विद्यार्थ्यांना प्रश्नमंजुषेच्या विविध टप्प्यांवर ही बक्षिसे दिली जातील.
आयआयटी आणि जेईई प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या वतीने प्रश्नमंजुषेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीतील अव्वल गुणप्राप्त स्पर्धक राज्य फेरीत प्रवेश करतील आणि या फेरीत ते संबंधित राज्यातील विजेते होण्यासाठी स्पर्धा करतील.36 शालेय संघ (प्रत्येक राज्य आणि/किंवा केंद्रशासित प्रदेशातील विजेते) नंतर या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या राष्ट्रीय फेरीत जातील. आणि ही फेरी स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर आणि अनेक समाजमाध्यम वाहिन्यांवर प्रसारित केली जाईल.
प्रश्नमंजुषेच्या प्रत्येक स्तरावरील विजेत्यांना रोख बक्षिसांनी (शाळा तसेच दोन सहभागी) आणि भारताचा पहिला फिट इंडिया राज्य/राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा विजेता म्हणून सन्मानित करण्यात येईल.
भारताच्या समृद्ध क्रीडा इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि भारताच्या शतकानुशतके जुन्या स्वदेशी खेळांबद्दल आणि आपल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक क्रीडा नायकांबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती करून देणे हा या प्रश्नमंजुषेचा मुख्य उद्देश आहे.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792564)
Visitor Counter : 170