भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

गोवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून राष्ट्रीय मतदार दिन साजरा


राज्यपालांच्या हस्ते फिल्ड आऊटरीच ब्युरोने आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Posted On: 25 JAN 2022 4:24PM by PIB Mumbai

गोवा, 25 जानेवारी 2022

राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत आज गोवा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून मतदार दिन साजरा करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते याप्रसंगी फिल्ड आऊटरीच ब्युरो यांनी आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल, प्रभारी मुख्य सचिव पुनीत गोयल आणि राज्य निवडणूक आयुक्त वी.वी. रमनमूर्ती यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

भारताच्या सर्वोत्तम निवडणूक पद्धतीमुळे देशात लोकशाही रुजली असल्याचे राज्यपाल म्हणाले. भारतीय निवडणूक आयोग आणि गोवा निवडणूक कार्यालयाने मतदार जागृतीसाठी हाती घेतलेल्या व्यापक कार्यक्रमांची राज्यपालांनी प्रशंसा केली.

गोवा निवडणूक कार्यालयाने विशेष आणि दिव्यांग मतदारांसाठी ब्रेल लिपीतून निवडणूक माहिती उपलब्ध करुन दिली आहे. तसेच कोविड-19 संक्रमण लक्षात घेऊन मतदान केंद्रांची रचना केली आहे, त्याचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल म्हणाले की, यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाची संकल्पना ‘सर्वसमावेशक, सुलभ आणि सर्वांचा सहभाग’ ही आहे. निवडणूक आयोगाने नुकताच ‘तुमचा उमेदवार जाणून घ्या’ या मोबाईल ऍपची निर्मिती केली आहे, त्याविषयी कुणाल यांनी माहिती दिली. 

फिल्ड आऊटरीच ब्युरोने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रवींद्र भवन, मडगाव येथे राज्यातील निवडणुकांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. तसेच मतदार जागृतीसाठी फिल्ड आऊटरीच ब्युरोची चार कलापथके राज्यभर कमी मतदान होत असलेल्या भागांमध्ये 12 फेब्रुवारीपर्यंत मतदानजागृतीचे कार्यक्रम सादर करणार आहेत.

 

S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792512) Visitor Counter : 177


Read this release in: English