माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर फिल्म डिव्हिजनद्वारे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन

Posted On: 25 JAN 2022 2:22PM by PIB Mumbai

मुंबई, 25 जानेवारी 2022

25 जानेवारी 2022 या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त, "आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत, फिल्म्स डिव्हिजन, भारतातील निवडक पर्यटन स्थळांचे वैभव दाखविणाऱ्या  चित्रपटांचा महोत्सव सादर करत आहे. या ऑनलाइन फिल्मोत्सवात (चित्रपट महोत्सवात) मेघालय, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर या राज्यांच्या नैसर्गिक सौंदर्याचे चित्रण करणारे अकरा चित्रपट प्रदर्शित केले जातील, तसेच उत्तराखंडमधील रंगीबेरंगी फुलांचे खोरे, बिहारमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे तसेच बरेच काही पहायला मिळेल. फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि यू ट्यूब वाहिनीवर दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी हे विशेष चित्रपट दाखवले जातील.

पर्यटन दिवसाच्या निमित्ताने दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये पुढील चित्रपट समाविष्ट आहेत:

चित्रकूट (2000/सुरेश मेनन) - भारतीय महाकाव्य रामायणातील लोककथांशी गहनतेने जोडलेला चित्रकूट पर्वत आणि त्याचा ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि पौराणिक वारसा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविलेला आहे.

मेघालय - अ‍ॅबोड ऑफ क्लाउड्स (2004/पी. किशोर) - हा चित्रपट आपल्याला विविधतेने नटलेल्या मेघालयाच्या थेट कुशीत घेऊन जातो. मेघालय अप्रतिम निसर्ग सौन्दर्य या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

सिक्कीम - पॅराडाईज ऑन अर्थ (2006/ए.के. भट्टाचार्य) - निसर्गरम्य सिक्कीम आणि तेथील पर्यटन स्थळांच्या  अविस्मरणीय सहलीबद्दल माहिती देणारा लघूपट.

किन्नौर (2009/आर. प्रेमराज) - हिमाचल प्रदेशातील किन्नौर ज्याला देव भूमी - देवांची भूमी म्हणून ओळखले जाते, त्यावरील हा चित्रपट, श्रध्दा आणि सौंदर्याचा अदभुत  संगम या चित्रपटातून दर्शवतो.

अनटच्ड ब्युटी (2009/विप्लव राय भाटिया) - शीर्षकानूरुप, अनटच्ड ब्युटी हा भारताच्या ईशान्य प्रदेशातील पर्यटनाला चालना देणारा एक चित्रपट आहे, ज्या प्रदेशाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे.

रीगेनिंग पॅराडाइज (2010/शहजाद रसूल) - हा चित्रपट काश्मीरमधील पर्यटनाच्या पुनरुज्जीवनाबद्दल आहे.

द व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (2010/के.एस. श्रीधर) - हा चित्रपट उत्तराखंडच्या सर्वात रहस्यमय भागावर आहे, जो हिमालय पर्वतरांगांच्या अत्युच्च भागात वसलेला आहे.  व्हॅली ऑफ फ्लॉवर्स मधे वनस्पतींच्या 600 हून अधिक प्रजाती सापडतात, त्यापैकी बहुतेकांमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि काही पर्यावरणातून नष्ट होण्याच्या धोक्याच्या मार्गावर आहेत.

डेस्टिनेशन बिहार - व्हेअर फेथ कॉल्स (2011/प्रदिप सिन्हा) - बिहारमधील बोधगया, नालंदा, गया, राजगिरी, पावापुरी आणि पाटणा शहरातील पर्यटन स्थळांवर आधारित व्यक्ती, ठिकाणे आणि श्रद्धेयांवर आधारित माहितीपट.

लँडस्केप इन द मिस्ट: पूर्व-इतिहास पुनरावृत्ती (2012 /अनासुआ रॉय चौधरी) -चेरापुंजी आणि मेघालयातील मावसिनराम या दोन निसर्गरम्य ठिकाणांचा प्रवास चित्रीत करणारा चित्रपट

मिझो : क्लाउड नाईन (2015/आतिश नंदी) - शांततेचे वसतिस्थान असलेल्या मिझोरामला भेट देण्याचे निमंत्रण.

गेटवे ऑफ इंडिया - द प्राइड ऑफ मुंबई (2018/पी. राजेंद्रन) - हा लघुपट मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या 'गेटवे ऑफ इंडिया'च्या ऐतिहासिक आणि राजकीय प्रवासाचा मागोवा घेतो.

हे चित्रपट या संकेतस्थळावर https://filmsdivision.org/Documentary of the Week आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision वर 25 जानेवारी 2022 रोजी 24 तास प्रसारित केले जाईल.

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792462) Visitor Counter : 266


Read this release in: English