आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 प्रतिबंधक लसीची राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील उपलब्धतेची अद्ययावत माहिती


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या 161 कोटी 47 लाखांपेक्षा अधिक मात्रांचा केला पुरवठा

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही लसीच्या न वापरलेल्या 13 कोटी 32 लाखांपेक्षा अधिक मात्रा शिल्लक

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2022 9:16AM by PIB Mumbai

देशभरातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड लसीकरण अभियान 16 जानेवारी 2021 ला सुरु झाले. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. अधिक प्रमाणात लस उपलब्धता करून  लसीकरणाच्या अभियानाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली जात आहे, त्यामुळे लसीकरण मोहिमेचे अधिक उत्तम नियोजन त्यांना करणे शक्य होईल. तसेच लसींची पुरवठा साखळी सुरळीत, विनाखंड ठेवता येईल.


देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा विनामूल्य पुरवठा करून केंद्र सरकार सहकार्य करत आहे. केंद्र सरकार कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात, देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा मोफत पुरवठा केला जात आहे.

 

VACCINE DOSES

 

(As on 23rd January 2022)

 

SUPPLIED

 

1,61,47,69,885

 

BALANCE AVAILABLE

 

 

13,32,44,836

 

केंद्र सरकारने आतापर्यंत लसींच्या 161 कोटी 47  लाखांपेक्षा अधिक (1,61,47,69,885) मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत पध्दतीने) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.


13 कोटी 32 लाखांपेक्षा अधिक न वापरलेल्या (13,32,44,836) मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप शिल्लक आहेत.


***

ST/SampadaP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1791921) आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu