माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त फिल्म्स डिव्हिजन कडून माहितीपटांचे प्रसारण

प्रविष्टि तिथि: 22 JAN 2022 4:11PM by PIB Mumbai

 

देशभक्तीचे खरे प्रतीक आणि महान स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2022 रोजी फिल्म्स डिव्हिजन, नेताजींचे जीवन, अदम्य साहस आणि देशाप्रति निःस्वार्थ सेवा यावर आधारित दोन माहितीपट दाखवून त्यांना आदरांजली वाहत आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून नेताजींच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून हे खास माहितीपट दाखवले जाणार आहेत. फिल्म्स डिव्हिजनचे संकेतस्थळ आणि यूट्यूब चॅनलवर हे चरित्रपट 24 तास प्रसारित केले जातील.

दाखवण्यात येणारे चित्रपट आहेत: द फ्लेम बर्न्स ब्राइट (1973/आशिष मुखर्जी) आणि नेताजी (1973/अरुण चौधरी), यामध्ये या महान नेत्याचे जीवन आणि ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून भारताला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी दाखवलेले शौर्य आणि अथक लढा यांचे दर्शन घडते.  'नेताजी' या चित्रपटात नेताजींची भाषणे वापरण्यात आली असून, त्यांच्या आवाजाशी सुसंगत आहेत.

हे प्रेरणादायी चित्रपट पाहण्यासाठी कृपया https://filmsdivision.org/  वर लॉग ऑन करा आणि  @ Documentary of the Week वर क्लिक करा किंवा  फिल्म्स डिव्हिजन युट्यूब चॅनल https://www.youtube.com/user/FilmsDivision  फॉलो करा.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1791773) आगंतुक पटल : 315
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English