संरक्षण मंत्रालय
जर्मनीच्या नौदल अधिकाऱ्याचे वैद्यकीय मदतीसाठी आयएनएचएस अश्विनीमध्ये स्थलांतरण
Posted On:
21 JAN 2022 6:50PM by PIB Mumbai
मुंबई, 21 जानेवारी 2022
भारतीय नौदलाने जर्मनीच्या नौदल अधिकाऱ्याला तत्परतेने वैद्यकीय मदत आणि सहाय्य उपलब्ध करून दिले.
जर्मनीच्या दूतावासाने केलेल्या विनंतीवरून या रुग्णाला सुपर लिनक्स हेलिकॉप्टरच्या मदतीने आयएनएस शिक्रा येथे ठेवण्यात आले होते. मुंबई किनारपट्टीपासून सुमारे 275 किलोमीटर दूर उभ्या असलेल्या बायर्न या जर्मनीच्या नौदलाच्या जहाजावरून रुग्णाच्या वैद्यकीय स्थलांतरणासाठी पश्चिमी नौदल कमांडने सर्व समन्वय साधला.
आयएनएचएस अश्विनी या नौदल रुग्णालयात आणल्यानंतर विविध वैद्यकीय शाखांच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांची प्राथमिक तपासणी केली त्यानंतर विविध चाचण्या केल्या. रुग्णाची तब्येत आता स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791585)
Visitor Counter : 190