आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीच्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्धतेविषयी अद्ययावत माहिती


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 156.05 कोटी लसीच्या मात्रांचा केला पुरवठा

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप न वापरलेल्या 17.57 कोटींपेक्षा जास्त लसीच्या मात्रा शिल्लक

Posted On: 10 JAN 2022 9:50AM by PIB Mumbai

नवी दिल्ली - दि. 10 जानेवारी 2022

संपूर्ण देशामध्ये कोविड-19 प्रतिबंधक लस देण्याच्या अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेला दि. 16 जानेवारी, 2021 रोजी प्रारंभ झाला.  या अभियानाच्या नवीन टप्प्याला दि. 21 जून, 2021पासून प्रारंभ झाला. लसींची उपलब्धता मुबलक असल्यामुळे लसीकरण कार्याला वेग देण्यात आला आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या उपलब्धतेविषयी पूर्वसूचना देण्यात येत असल्यामुळे ते लसीकरण मोहिमेचे अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतीत त्याचबरोबर लस पुरवठा साखळी विनाखंड सुरू राहील, याचा विचार केंद्र सरकारने केला आहे. 

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या मात्रांचा विनामूल्य पुरवठा करून केंद्र सरकार सहकार्य करीत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यामध्ये देशातल्या लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करून, त्यांचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवठा केला जात आहे.

VACCINE DOSES

 

(As on 10th January 2022)

 

SUPPLIED

 

1,56,05,78,415

 

BALANCE AVAILABLE

 

 

17,57,32,266

 

 

केंद्र सरकारने आत्तापर्यंत लसींच्या 156.05 कोटींपेक्षा (1,56,05,78,415) जास्त मात्रा  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्यांव्दारे खरेदी प्रक्रियेच्या माध्यमातून म्हणजेच इतर सर्व स्त्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत.

अद्याप न वापरण्यात आलेल्या 17.57 कोटींपेक्षा (17,57,32,266) जास्त मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

***

MC/SB/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788879) Visitor Counter : 138