पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद -राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था ,गोवा आणि केशव देव मालवीय पेट्रोलियम अन्वेषण संस्था , डेहराडून यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
05 JAN 2022 9:46PM by PIB Mumbai
गोवा, 5 जानेवारी 2022
सुधारित भूपट्टे भूसंरचनिक पुनर्रचना मॉडेल विकसित करण्याच्या दृष्टीने, भारताच्या खंडीय किनाऱ्याची रचना आणि विकास तसेच संलग्न खोल महासागर खोऱ्यांशी संबंधित क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन संयुक्त कार्य भागीदारी विकसित करण्यासाठी ,वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था ,गोवा (सीएसआयआर -एनआयओ) आणि केशव देव मालवीय पेट्रोलियम अन्वेषण संस्था, देहराडून (केडीएमआयपीई -ओएनजीसी) यांनी 05 जानेवारी 2022 रोजी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.या व्यतिरिक्त, या संस्था अपारंपरिक हायड्रोकार्बन संसाधनांच्या क्षेत्रात उदा. क्षेत्र प्रमाणीकरणासह गॅस हायड्रेट अन्वेषण आणि विकास याचा संयुक्त अभ्यास देखील करतील
या सामंजस्य करारावर सीएसआयआर -एनआयओचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंहा आणि केडीएमआयपीई संस्थेचे प्रमुख एस.एन. चिटणीस यांनी आभासी माध्यमातून स्वाक्षरी केली.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787823)
Visitor Counter : 89