माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारच्या गेल्या सात वर्षातील कामगिरीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचा गोव्याची राजधानी पणजी इथे शुभारंभ


‘सेवेची सात वर्षे- भारताचे आमूलाग्र परिवर्तन’ या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 05 JAN 2022 8:42PM by PIB Mumbai

गोवा, 5 जानेवारी 2022

 

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील ब्यूरो ऑफ आऊटरिच कार्यालयाची शाखा असलेल्या गोव्यातील जनसंपर्क विभागाने,  केंद्र सरकारच्या गेल्या सात वर्षातील कामगिरीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पांच दिवसांच्या या बहुमाध्यमी प्रदर्शनात, भारत सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली आहे.गोव्याची राजधानी पणजी इथे होणाऱ्या सरस मेळाव्याच्या बाजूला, हे प्रदर्शन भरवण्यात आले असून, “सेवेची सात वर्षे’ अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले, गोवा सरकारचे ग्रामविकास मंत्री मायकल लोबो हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. केंद्र सरकारच्या तेरा योजना, ज्यात आत्मनिर्भर भारत, आयुष्मान भारत, जल जीवन मिशन, एमएसएमई योजना, किमान हमीभाव, पीएम मुद्रा योजना, पीएम आवास योजना, पीएमजीकेवाय, पीएम किसान योजना यासह प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य), स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना आणि मोफत कोविड लसीकरण याविषयीची माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.

   

वर नमूद केलेल्या विविध योजनांची तपशीलवार आकडेवारी आणि वैशिष्ट्ये या प्रदर्शनात देण्यात आलेली आहे. ज्यामुळे लोकांना केवळ योजनेची माहितीच मिळत नाही तर लोकांना योजनेचे लाभ घेण्यासाठी आणि  अंमलबजावणीसाठी प्रेरणा मिळते. या प्रदर्शनात, असलेली तपशीलवार माहिती,  समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारची दृढ वचनबद्धता व्यक्त करणारी आहे.

प्रदर्शनात दाखवण्यात आलेले महत्वाचे टप्पे, गेल्या सात वर्षांतील एक राष्ट्र म्हणून झालेला प्रवास एक राष्ट्र म्हणून आपल्या सामर्थ्याचा पुरावा आहे. गेल्या काही वर्षांत देशात जो मजबूत पाया घातला गेला आहे, त्यामुळे, आज आपण ज्या आव्हानात्मक आणि कठीण काळातून जात आहोत, त्यातून पुन्हा चिवटपणे बाहेर पडू शकू, असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण झाला आहे.

  

लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, आणि सरकारच्या योजनांची माहिती घेऊन, त्यापासून प्रेरणा घ्यावी, अशी विनंती विभागाने केली आहे.

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1787802) Visitor Counter : 178


Read this release in: English