विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-एनआयओने साजरा केला 57 वा वर्धापन दिन
Posted On:
01 JAN 2022 6:06PM by PIB Mumbai
गोवा, 1 जानेवारी 2022
सीएसएआयआर- राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने आज 57 वा वर्धापन दिन साजरा केला. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी कार्यक्रमाला व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित केले. राज्यपालांनी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या संशोधन कार्याचे कौतुक केले. राज्यपाल म्हणाले, आर्थिक आणि व्युहात्मकदृष्ट्या दिवसेंदिवस सागरांचे महत्व वाढत आहे. तसेच सागर विविध स्रोतांचा खजिना असून भूभागापेक्षा सागरी संशोधनावर भर दिला जात आहे.
राज्यपालांनी संस्थेच्या अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन कार्यक्रमाबद्दल अभिनंदन केले. भविष्यात संस्थेने सागरी संशोधनात नवनवीन उंची गाठावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
तत्पूर्वी संस्थेचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांच्या हस्ते संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी संचालकांनी विविध श्रेणीतील पुरस्कार जाहीर केले. यात वैयक्तिक आणि सामुहिक पुरस्कारात डॉ सत्यवती पनकला राव पुरस्कार, गीता मुखोपध्याय उत्कृष्ठ दीर्घ लेख प्रबंधन (थेसिस) पुरस्कार, आयसीबीएबी उत्कृष्ट पेपर सादरीकरण, एसीएसआयआर उत्तम गुण पुरस्कार, सागर सुक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आले. प्रधान शास्त्रज्ञ डॉ सनील कुमार यांनी यांनी आभारप्रदर्शन केले.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786824)
Visitor Counter : 153