राष्ट्रपती कार्यालय
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2021 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2021
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नववर्ष 2022 च्या पूर्वसंध्येला सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये राष्ट्रपतींनी म्हटले आहे , “नववर्ष 2022 च्या आनंददायक प्रसंगी, मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या माझ्या सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
नवीन वर्षाची नवी पहाट आपल्या जीवनात शांती, समृद्धी आणि बंधुभावाचे चैतन्य पुनश्च जागृत करो! आपल्या समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प नवीन वर्षात करू या.
नवीन वर्ष-2022 तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणि उत्तम आरोग्य तसेच यश आणि भरभराट घेऊन येवो.”
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1786656)
आगंतुक पटल : 287