विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत बायोलॉजिकल ई लिमिटेडची कोविड -19 प्रतिबंधक लस - कॉर्बीवॅक्सटीएम CORBEVAXTM ला आपत्कालीन वापरासाठी भारतीय औषध महानियंत्रकांकडून मिळाली मंजुरी

Posted On: 29 DEC 2021 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2021


कोविड-19 प्रतिबंधासाठी भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची रिसेप्टर बाइंडिंग डोमेन (RBD) प्रोटीन सब-युनिट लस,कॉर्बीवॅक्सटीएम  बायोलॉजिकल ई लिमिटेडने विकसित केली असून तिला आपत्कालीन वापरासाठी भारतीय औषध महानियंत्रकांकडून  मंजुरी  प्राप्त झाली आहे.

जैवतंत्रज्ञान  विभाग (DBT) आणि त्याचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC), यांनी बायोलॉजिकल ई च्या कोविड -19 लसीला  तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल अभ्यासाद्वारे पाठबळ पुरवले आहे. या लसीच्या  प्री-क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी अभ्यासासाठी, नॅशनल बायोफार्मा मिशनद्वारे, कोविड -19 रिसर्च कंसोर्टियम अंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले. नंतर क्लिनिकल विकासासाठी मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत सहाय्य प्रदान करण्यात आले.,कॉर्बीवॅक्सटीएम ( CORBEVAXTM)  ही 2-मात्रांची लस आहे जी स्नायूंमध्ये टोचून (इंट्रामस्क्युलर)  दिली जाते आणि 2ºC ते 8ºC तापमानात साठवली जाऊ शकते.

व्हायरल पृष्ठभागावरील स्पाइक प्रोटीनच्या रिसेप्टर बिडिंग डोमेन (RBD) मधून विकसित केलेली रीकॉम्बीनंट प्रोटीन सब-युनिट लस डायनाव्हॅक्सच्या CpG 1018 आणि तुरटीसह मिसळली  जाते. संपूर्ण भारतातील 33 अभ्यास स्थळांवर 18 ते 80 वयोगटातील 3000 हून अधिक लोकांवर तिसऱ्या टप्प्यातील  चाचणीत लस सुरक्षित, आणि अत्यंत रोगप्रतिकारक असल्याचे दिसून आले आहे . ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (THSTI), या डीबीटीच्या  स्वायत्त संस्थेने या अभ्यासासाठी इम्युनोजेनिसिटी डेटा प्रदान केला आहे.

जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ राजेश गोखले म्हणाले, “EUA ते CORBEVAXTM हे यशस्वी शैक्षणिक-उद्योग सहकार्याचे आणखी एक उदाहरण आहे. ही लस महामारीचा अंत करण्याच्या देशाच्या प्रयत्नांना गती देईल. महामारीविरोधात लढण्यासाठी स्वदेशी लसींच्या विकासामुळे देशातील वैज्ञानिक  आणि उत्पादकांना देशातील समस्या सोडवण्यासाठी प्रेरणा मिळेल.”

बायोलॉजिकल ई. लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक महिमा दतला, म्हणाल्या, “लसीकरण हे राष्ट्रीय अभियान बनवल्याबद्दल आम्ही  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  विशेष आभार मानू इच्छितो. इतक्या मोठ्या क्षमतेने लस उत्पादन करण्यात  त्यांची दूरदृष्टी आणि वचनबद्धता यांचा महत्त्वाचा वाटा होता. लस विकासाला गती देण्यासाठी कोविड सुरक्षा कार्यक्रमाच्या प्रयत्नाने सुरुवातीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून  जैवतंत्रज्ञान विभाग आणि डीबीटी-बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (बीआयआरएसी) च्या सहकार्याने स्थापन केलेल्या यंत्रणेने आम्हाला दर वर्षी सुमारे 1.2 अब्ज मात्रा इतकी क्षमता वाढवण्याची अनुमती दिली आणि सर्वांना सहज उपलब्ध असणाऱ्या, किफायतशीर आणि मोठ्या प्रमाणात पुरवठा शक्य असलेल्या  लसीचे स्वप्न साकार होऊ शकले.


* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1786187) Visitor Counter : 215


Read this release in: English , Urdu , Hindi