आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडील कोविड-19 लसींच्या मात्रांच्या उपलब्धतेबद्दल अद्ययावत माहिती
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे एकूण 148.37 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रा उपलब्ध
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही लसीच्या न वापरलेल्या 17.74 कोटींपेक्षा अधिक मात्रा शिल्लक
Posted On:
25 DEC 2021 9:32AM by PIB Mumbai
देशभरातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड लसीकरण 16 जानेवारी 2021 ला सुरु झाले. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे जेणेकरुन ते लसीकरणाचे अधिक उत्तम नियोजन करु शकतील आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.
देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. केंद्र सरकार कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा मोफत पुरवठा केला जात आहे.
VACCINE DOSES
|
(As on 25th December 2021)
|
SUPPLIED
|
1,48,37,98,635
|
BALANCE AVAILABLE
|
17,74,97,506
|
केंद्र सरकारने आतापर्यंत 148 कोटी 37 लाखांपेक्षा जास्त (1,47,37,98,635) लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.
17.74 कोटी (17,74,97,506) न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप शिल्लक आहेत.
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785083)
Visitor Counter : 193