संरक्षण मंत्रालय

आपत्ती सज्जता चर्चेच्या यशस्वी आयोजनासह पॅनएक्स-21 (PANEX-21) चा समारोप

Posted On: 22 DEC 2021 8:03PM by PIB Mumbai

पुणे, 22 डिसेंबर 2021

 
20 ते 22 डिसेंबर 2021 दरम्यान पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पॅनएक्स-21 हा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव आज संपन्न झाला. शेवटच्या दिवशी, महामारीच्या पार्श्वभूमीवर मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्ये आयोजित करताना समोरील आव्हाने, आकस्मिकता आणि उपाययोजनांशी संबंधित विविध पैलूंवर  आपत्ती सज्जता चर्चा (टेबल टॉप एक्सरसाईज) आयोजित करण्यात आली. तीन दिवसांच्या या सरावात बिमस्टेक देशांतील वरिष्ठ अधिकारी, सरकारी अधिकारी आणि विषय तज्ञांचा वक्ते म्हणून सहभाग होता. PANEX-21 मध्ये भारतीय उद्योगांद्वारे भविष्यातील महामारीसारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपकरणांच्या क्षमतेचे प्रदर्शन देखील समाविष्ट होते.  या प्रदर्शनात  मानवता मदत आणि आपत्कालीन बचाव कार्य करताना  भारताने मिळवलेले कौशल्य दाखविले होते.   ज्यात पूर्व सूचना, रिमोटली पायलटेड वाहनांद्वारे (RPVs) टेहळणी, मानवरहित हवाई वाहने (UAVs), उपग्रह, आपत्तीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण सॉफ्टवेअर, संसाधन व्यवस्थापन सॉफ्टवेअर्स, कमांड कंट्रोल सेंटर्सची स्थापना जसे की इन्सिडेंट कमांड पोस्ट (ICP) इ. दक्षिण आणि आग्नेय आशियातील समान सुरक्षा समस्यांना सामोरे जाण्यासाठी  250 हून अधिक वस्तूंच्या प्रदर्शनासह खासगी भारतीय संरक्षण उद्योगाची क्षमता देखील प्रदर्शित केली. या सरावामध्ये माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेले बहू संस्थात्मक सरावाचे निरीक्षण आणि संकलन पुस्तिकेचे प्रकाशन यांचा देखील अंतर्भाव होता.

आपत्ती सज्जता चर्चेदरम्यान, व्यवसाय संघामध्ये विभागलेल्या सर्व प्रतिनिधींमार्फत आपत्कालीन परिस्थितींवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक  संघाने संयुक्त मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्यान्वयनाची कार्यपद्धती, महामारीच्या परिस्थितीत कार्य करण्यासाठी नियमावली आणि अशा क्रिया करण्यासाठी तंत्रज्ञान आणि उपलब्ध संसाधने सादर केली. चर्चासत्रे आणि बहू संस्थात्मक सरावादरम्यान मिळालेला अनुभव आपत्ती सज्जता चर्चेदरम्यान चांगल्या प्रकारे प्रतीत झाला. चर्चेद्वारे वर्धित तयारी आणि प्रभावी प्रतिसाद यंत्रणा प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ देखील प्रदान केले गेले. क्षमता विकास, प्रशिक्षण आणि संसाधनांचे प्रादेशिक एकत्रीकरण यावरील महत्त्वाचे धडेही   सत्रांनंतर देण्यात आले.

सशस्त्र दलांची एक कुशल सेना आणि काही वेळा आपत्तीच्या परिस्थितीत प्रथम प्रतिसाद देणारी म्हणून भूमिका याविषयी चर्चासत्रादरम्यान मत मांडण्यात आले. आपत्ती सज्जता चर्चेदरम्यान हे परस्पर सहमत झाले की प्रादेशिक आंतरराष्ट्रीय प्रतिसाद यंत्रणा विकसित करण्यासाठी लष्कर-ते-लष्कर सहकार्याकरिता नियमावली विकसित करणे आवश्यक आहे. आपत्ती सज्जता चर्चेतील सहभागींना संबोधित करताना, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन  यांनी आपत्तींच्या समान आव्हानांवर मात करण्यासाठी बिमस्टेक राष्ट्रांमधील सहकार्यासाठी आराखडा, माहितीची देवाणघेवाण यंत्रणा आणि नियमावलीची आवश्यकता स्पष्ट केली. ही चर्चा  यशस्वी झाली आणि त्यादरम्यान शिकलेले धडे BIMSTEC राष्ट्रांमध्ये संयुक्त नियमावली विकसित करण्यासाठी खूप मोलाचे ठरतील.

 

* * *

PRO(Defence), Pune-M.Iyengar/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1784377) Visitor Counter : 267


Read this release in: English