गृह मंत्रालय
फोटो बातमी- गृह मंत्री अमित शाह यांची पुण्याजवळ केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल येथे भेट
Posted On:
19 DEC 2021 6:39PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा, पुणे येथील परिसरात नव्या इमारतीचे उद्घाटन केले.

या प्रसंगी बोलताना ते म्हणले, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपासकार्य पारदर्शक आणि वेगवान करून देशाची फौजदारी न्यायव्यवस्था सशक्त करण्यात केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांचे जाळे प्रत्येक जिल्ह्यात विस्तारण्याचा प्रस्ताव आहे, असं त्यांनी सांगितलं. गृह मंत्र्यांनी प्रत्येक राज्य सरकारला न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालये स्थापन करून ती राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाशी संलग्न करून घेण्याचे आवाहन केले. यामुळे मनुष्य बळ आणि कौशल्य विकासातील अडथळे दूर होण्यास मदत होईल, असं ते म्हणले.
पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांशी गृह मंत्र्यांनी संवाद साधला. या वेळी बोलताना ते म्हणाले राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दल यांनी आपली एक प्रतिमा बनविली आहे, कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी, विनाविलंब लोकांची सुटका केली आहे.


मंत्र्यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांसोबत दुपारचे जेवण घेतले.


या आधी अमित शाह यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट आली आणि गणपतीची पूजा केली.


***
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1783247)
Visitor Counter : 218