अर्थ मंत्रालय
92 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार केल्याप्रकरणी सीजीएसटी अधिकाऱ्यांकडून सनदी लेखापालाला अटक
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2021 9:57PM by PIB Mumbai
मुंबई, 15 डिसेंबर 2021
92 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार करून मालाच्या खऱ्या पावतीशिवाय 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त बनावट देयक पावत्या तयार केल्याप्रकरणी ठाणे (ग्रामीण) च्या सीजीएसटी अधिकार्यांनी सनदी लेखापालाला अटक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी एका गृहिणीच्या ओळखीचा वापर करून अंबरनाथ (ठाणे) येथे मेसर्स श्रद्धा इलेक्ट्रिकल.नावाची कंपनी तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या सनदी लेखापालासह काही व्यक्ती माल कोणत्याही ठिकाणी न हलवता, बनावट आयटीसी तयार करण्याच्या टोळीमध्ये गुंतल्याचे आणि तो पुढे पाठवत असल्याचे तपासातून समोर आले आहे.अधिकाऱ्यांनी सनदी लेखापालाला 14 डिसेंबर 2021 रोजी दुपारी सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत अटक केली. त्याला मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1781989)
आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English