संरक्षण मंत्रालय
ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ (पश्चिम) यांची कारवार नौदल तळाला भेट
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2021 8:45PM by PIB Mumbai
मुंबई, 15 डिसेंबर 2021
पश्चिम नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर,पहिल्यांदाच 14 आणि 15 डिसेंबर 2021 रोजी कारवार येथील नौदल तळाला भेट दिली. रिअर अॅडमिरल महेश सिंह , एनएम, ध्वज अधिकारी कमांडिंग कर्नाटक नोडल क्षेत्र (एफओके) यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना मानवंदना दिली.

या भेटीदरम्यान, ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ (पश्चिम) यांनी कारवार येथील जहाजे आणि विभागांच्या कार्यान्वयन सज्जतेचा आढावा घेतला आणि सीबर्ड प्रकल्पा अंतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासाच्या प्रगतीबद्दल त्यांना माहिती देण्यात आली.

* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1781979)
आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English