संरक्षण मंत्रालय
गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय नौदलाकडून परिसंवादाचे आयोजन
Posted On:
13 DEC 2021 2:25PM by PIB Mumbai
पणजी, 13 डिसेंबर 2021
गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय नौदलाच्या गोवा विभागाकडून परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, 14 डिसेंबर रोजी दाबोळी येथील राजहंस सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात लष्करी सेवेतील तसेच शैक्षणिक क्षेत्रातील वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन होणार असून प्रारंभिक सत्रात त्यांचे बीजभाषण होणार आहे. गोवा नौदल विभागाचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल फिलीपोस प्युनमूटील स्वागतपर भाषण करणार आहेत. नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल ए बी सिंग यांची परिसंवादाला उपस्थिती असणार आहे.
पहिल्या सत्रात भारतीय सशस्त्र दलाची गोवा मुक्ती लढ्यातील कामगिरी तसेच गोव्याचा भू-राजकीय संदर्भ आणि गोवा मुक्तीनंतरची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती यावर सादरीकरण होईल. या सर्व सत्रांचे संचलन मुंबई येथील मेरीटाईम वेलफेअर सेंटरचे संचालक श्रीकांत केसनूर करणार आहेत.
* * *
V.Kumar/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1780856)
Visitor Counter : 208