संरक्षण मंत्रालय

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत जनरल रावत, ब्रिगेडियर  लिड्डर आणि विंग कमांडर चौहान या दिवंगत माजी छात्रांना श्रद्धांजली

Posted On: 11 DEC 2021 5:42PM by PIB Mumbai

 

तामिळनाडूतल्या कुन्नूर जिल्ह्यात 08 डिसेंबर 2021 रोजी  हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेल्या परम विशिष्ठ सेवा पदक,उत्तम युद्ध सेवा पदक,अति विशिष्ठ सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, एडीसी सन्मानित चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावतब्रिगेडिअर लखबिंदर सिंह लिददृर (सेना पदक, विशिष्ठ सेवा पदक  सन्मानित) आणि विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांना आज राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत(एनडीए ) श्रद्धांजली वाहण्यात आली.

एनडीएमधल्या 'हट ऑफ रिमेम्बरन्स' येथे एनडीए प्रमुख एअर मार्शल संजीव कपूर (एवीएसएम वीएम) यांनी एनडीए परिवारातर्फे  श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रबोधिनीतले सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सीडीएस जनरल बिपीन रावत एनडीएच्या 53 व्या तुकडीच्या  चार्ली स्क्वाड्रनचे माजी विद्यार्थी होते आणि देशाचे 27 वे लष्करप्रमुख म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये ते देशाचे चीफ ऑफ स्टाफ  झाले. 'हट ऑफ रिमेम्बरन्स' पुस्तकात लिहिले आहे, ''एखाद्याच जनरलला सेवेत असताना मृत्यू येतो. कर्तव्य बजावताना मृत्यू आलेले सर्वात वरिष्ठ सैनिक म्हणून जनरल रावत यांनी आपले नाव  'हट ऑफ रिमेम्बरन्स'मध्ये कोरले आहे. ही त्यांची कीर्ती आहे.''

ब्रिगेडिअर लखबिंदर सिंह लिद्दर एनडीएच्या 77व्या तुकडीचे, इंडिया स्क्वाड्रनचे माजी विद्यार्थी होते. मेजर जनरल म्हणून त्यांच्या पदोन्नतीला मान्यता मिळाली होती आणि लवकरच ते कार्यभार स्वीकारणार होते. सीडीएस यांचे संरक्षण सहायक म्हणून ते कर्तव्य बजावत होते. विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान एनडीएच्या 100 व्या तुकडीचे  फॉक्सट्रॉट स्क्वाड्रनचे माजी विद्यार्थी होते. 109 हेलीकॉप्टर यूनिटचे ते प्रमुख अधिकारी होते आणि एमआय -17 हे हेलिकॉप्टर दुर्घटनेवेळी ते चालवत होते. 'हट ऑफ रिमेम्बरन्स' मध्ये आज त्यांची नावे सुवर्णअक्षरात कोरली गेली. त्यांचे हौतात्म्य एनडीए विद्यार्थ्यांच्या पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील. एनडीए कुटुंब शूरवीरांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

***

M.Iyengar/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1780475) Visitor Counter : 223


Read this release in: English