वस्त्रोद्योग मंत्रालय

वर्ष 2021-22 मध्ये वस्त्रनिर्यातीत 44 दशलक्ष डॉलर्सचे उद्दिष्ट गाठणे आवश्यक :  केद्रीय मंत्री पियुष गोयल

Posted On: 10 DEC 2021 10:05PM by PIB Mumbai

 

आपण वर्ष 2021-22 मध्ये वस्त्रनिर्यातीत 44 दशलक्ष डॉलर्सचे उद्दिष्ट गाठायला हवे असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी केले. ते भारतीय वस्त्रोद्योगातील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधत होते.

उद्योगांना आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गरजांवर विचार करण्यासाठी सरकार सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. जे उद्योग अनुदानावर अवलंबून नाहीत त्यांची भरभराट होते असे ते म्हणाले.

वस्त्रोद्योगासाठी PLI  म्हणजेच उत्पादनाधारित प्रोत्साहन योजना आणि मित्रा पर्कस योजना यांचा या उद्योगाला मोठा लाभ होईल असेही गोयल पुढे म्हणाले.

निर्यातदारांनी आपले प्रयत्न, कौशल्य आणि क्षमता यांच्या सहाय्याने राष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सहकार्य केले पाहिजे, असे नमूद करून गोयल यांनी उद्योजकांनी नवनव्या बाजारपेठा शोधाव्यात अशी सूचना केली.

छोट्या निर्यातदारांची काळजी घेउन त्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन गोयल यांनी सहभागींना तसेच सर्व संबधितांना केले. नवनव्या स्पर्धात्मक आणि तुलनात्मक लाभ घेण्याच्या दृष्टीने अनुकूल परिसंस्था पुरवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे असेही त्यांनी नमूद केले. सुलभ कायदे, अनुपालनाची बंधने कमी करणे, RoSTCL RoDTEP सूची यांचा यात अंतर्भाव असल्याचे त्यानी सांगितले.

सध्य़ा विविध देशांशी  मुक्त व्यापार करार  दृष्टीपथात आहेत. या भावी करारांमुळे उद्योगातील भागीदारीची नविन दालने उघडतील, असे ते म्हणाले.

वस्त्रोद्योगातील उत्पादन आणि निर्यात वाढ यांना चालना देण्यासाठीच्या प्रयत्नांवर चर्चा करण्याच्या उददेशाने महत्वाचे वस्त्रनिर्यातदार, EPCs तसेच बडे उद्योगपती या संवादात सहभागी झाले होते.

***

S.Patil/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1780354) Visitor Counter : 176


Read this release in: English , Hindi