दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

21 डिसेंबर रोजी 50 वी विभागीय डाक अदालत

प्रविष्टि तिथि: 08 DEC 2021 4:44PM by PIB Mumbai

पणजी, 8 डिसेंबर 2021

पोस्टमास्तर जनरल कार्यालय, पणजी यांच्याकडून 21 डिसेंबर रोजी 50 व्या विभागीय डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पोस्टमास्तर जनरल, पणजी यांच्या कार्यालयात दुपारी 12.00 वाजता डाक अदालत पार पडेल.

गोवा परिक्षेत्रातील टपाल सेवेसंबंधीच्या तक्रारी, ज्यांचा सहा आठवड्यानंतरही निपटारा झाला नाही, त्यांची या डाक अदालतीमध्ये दखल घेण्यात येईल. पत्र, स्पीड पोस्ट, काऊंटरवरील सेवा, बचत बँक आणि मनी ऑर्डरचे प्रदान न होणे यासंबंधी तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारदाराने अर्ज करताना मूळ अर्जाचा तपशील देणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपल्या तक्रारींची दुसरी प्रत रमेश प्रभू, सचिव डाक अदालत आणि सहाय्यक संचालक, टपाल सेवा, पोस्टमास्तर जनरल कार्यालय, पणजी 403001 यांच्या नावे 10 डिसेंबरपूर्वी पाठवण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.

S.Thakur/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1779313) आगंतुक पटल : 183
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English