ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिवांची भारतीय अन्न महामंडळाच्या वर्ध्यातील धान्य साठवण डेपोला भेट; धान्य वितरण आणि चालू खरेदी हंगामाचा घेतला आढावा

प्रविष्टि तिथि: 07 DEC 2021 6:32PM by PIB Mumbai

वर्धा/मुंबई , 7 डिसेंबर 2021

केंद्र सरकारच्या अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहारचे सचिव सुधांशू पांडे यांनी 05.12.2021 रोजी वर्धा येथील भारतीय अन्न महामंडळाच्या धान्य साठवण डेपोला भेट दिली तसेच वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

या भेटीदरम्यान सचिवांनी महामंडळाचे महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक एम.एस.सारंग, विभागीय व्यवस्थापक, नागपूर नरेंद्र कुमार  आणि स.म.प्र (गुण नियंत्रण), नागपूर  अविनाश दाभाडे यांच्या सोबत आढावा घेवून डेपोच्या साठवण आणि वितरण कार्यावर समाधान व्यक्त केले.

सुमारे 87 एकर जागेत बांधण्यात आलेल्या वर्धा डेपो येथे एक लाख मेट्रिक टन क्षमतेची  गोदामे बांधण्याच्या प्रस्तावावर काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. गोदामांच्या छतावर सोलर पॅनेलचा वापर करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली आणि महामंडळाच्या अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक यांना सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय सचिवानी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा/ प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना  अंतर्गत धान्य वितरण आणि चालू खरेदी हंगामाचा आढावा महाव्यवस्थापक, महाराष्ट्र एम .एस .सारंग  आणि जिल्हाधिकारी वर्धा प्रेरणा देशभ्रतार, यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी लघु गोदाम उभारणीसंदर्भात ही चर्चा झाली.

शेतकरी उत्पादक संघटना व शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण/कार्यशाळा आयोजित करण्यात याव्या जेणेकरुन त्यांना त्यांच्या उत्पादनाची चांगली किंमत मिळू शकेल असे सचिव म्हणाले. यावेळी सचिवांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त  महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सेवाग्राम, वर्धा येथील बापू कुटीला भेट दिली .

 

S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1778975) आगंतुक पटल : 260
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English