खाण मंत्रालय
समर्पित खनिजवाहतूक रेल्वे मार्गिकांची उभारणी
Posted On:
06 DEC 2021 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2021
राष्ट्रीय उत्खनन धोरण 2019 अन्वये, एकात्मिक पद्धतीने स्थानिक पातळीवर खनिजे काढण्यासाठीच्या जाळ्याच्या उभारणीला प्रोत्साहन देण्यासह, समुद्र किनाऱ्याच्या लगतच्या परिसरात असलेल्या खाणींमधून काढलेल्या खनिजांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी समर्पित खनिज वाहतूक मार्गिकांचे नियोजन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पूर्व आणि पश्चिम अशा दोन समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. त्याशिवाय, मंत्रालयाने खालील तीन नव्या समर्पित मालवाहतूक मार्गिकांच्या उभारणीसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
(i) पूर्व-किनारपट्टी मार्गिका (खरगपूर ते विजयवाडा: 1115 किमी)
(ii) पूर्व-पश्चिम उप-मार्गिका
(a) (पालघर-भुसावळ-नागपूर-खरगपूर-डंकुनी: 2163 किमी आणि)
(b) राजखारसावन-कालीपहाडी-अंदल: 195 किमी)
(iii) उत्तर-दक्षिण उप-मार्गिका (विजयवाडा-नागपूर-इटारसी: 975 किमी)
समर्पित मालवाहतूक मार्गिकांची कमाल प्रवास परिमाणे अधिक मुक्त असतील आणि अवजड माल वाहून नेणाऱ्या अधिक अंतराच्या गाड्यांसाठी परवाने देणाऱ्या जागतिक मापदंडांच्या जास्त जवळचे असतील. समर्पित मालवाहतूक मार्गिकांचे तपशीलवार प्रकल्प अहवाल सागरी किनारपट्टी परिसरातील खनिजांच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या गरजा लक्षात घेऊन तयार केले आहेत.
केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1778631)