आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्ये / केंद्रशासित प्रदेशातल्या कोविड 19 प्रतिबंधक लस उपलब्धतेबाबत अद्ययावत माहिती
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 138 कोटींपेक्षा अधिक मात्रा पुरवण्यात आल्या
राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 21.13 कोटी पेक्षा जास्त मात्रा उपलब्ध
Posted On:
05 DEC 2021 2:45PM by PIB Mumbai
कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरणाची देशभरात व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी केंद्रसरकार कटीबद्ध आहे. देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली. कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसींची अधिक उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेवर आधीच दृष्टीक्षेप आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे.
देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा पुरवत आहे. कोविड-19 लसीकरण अभियानाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्यात केंद्र सरकार, देशातल्या लस उत्पादकांकडून उत्पादित 75% लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवत आहे.
VACCINE DOSES
|
(As on 5th December 2021)
|
SUPPLIED
|
1,38,95,38,030
|
BALANCE AVAILABLE
|
21,13,99,456
|
केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 138 कोटींपेक्षा जास्त (1,38,95,38,030 ) लसींच्या मात्रा राज्ये / केंद्रशासित पुरवल्या आहेत.
याशिवाय लसीच्या 21.13 कोटी पेक्षा जास्त ( 21,13,99,456 ) शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.
***
M.Chopade/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1778230)
Visitor Counter : 187