गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

मेट्रो लाइट आणि मेट्रो निओ प्रकल्पाद्वारे चार राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील वाहतुकीची  समस्या कमी होणार

Posted On: 02 DEC 2021 6:24PM by PIB Mumbai

 

लाइट अर्बन रेल ट्रान्झिट सिस्टम अर्थात हलक्या  शहरी रेल्वे वाहतूक प्रणालीवर आधारित  "मेट्रोलाइट" नावाचा प्रकल्प आणि "मेट्रो निओ" या नावाने ओळखला जाणारा रस्त्यावर धावणाऱ्या ओव्हरहेड कर्षण प्रणालीवर चालणारा रबर-टायर्ड इलेक्ट्रिक कोच हे प्रकल्प  हे कमी प्रवासी संख्येच्या वाहतुकीसह छोट्या शहरांसाठी किंवा वाहतुकीचे प्रमाण कमी असलेल्या शहरांसाठी  योग्य असून अनुक्रमे जुलै, 2019 आणि नोव्हेंबर, 2020 मध्ये याची  प्रमाणित वैशिष्ट्ये जारी करण्यात आली. वाहतुकीच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने मेट्रोलाईट आणि मेट्रोनिओ हे  प्रकल्प यंत्रणेची कमी किमतीत आवश्यकता आणि समान अनुभव, प्रवासातील सोई, सुविधा, किफायतशीर , सुरक्षित , वक्तशीर , विश्वासार्हआणि पारंपरिक मेट्रो रेल्वे प्रणालीला  पर्यावरण-अनुकूल असलेले कमी किमतीचे प्रकल्प आहेत. नागरी रचना, कमी एक्सल लोड, लहान स्थानके , कमी उर्जेवर चालणारी इलेक्ट्रिकल उपकरणे, \ कार्यान्वयन  आणि देखभाल खर्च कमी इत्यादीमुळे उच्च क्षमतेच्या मेट्रो रेल्वेच्या तुलनेत या नवीन वाहतूक प्रकल्पाचा भांडवली खर्च कमी आहे. या प्रणालींचा वापर पारंपरिक मेट्रो रेल्वेसाठी फीडर प्रणाली म्हणून देखील केला जाऊ शकतो.

शहरी विकासाचा अविभाज्य भाग असलेला शहरी वाहतूक हा राज्याचा विषय आहे. म्हणून, रेल्वे  आधारित एकत्र वाहतूक पद्धती   उदा. मेट्रो रेल/मेट्रोलाइट/मेट्रोनिओ/रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (आरआरटीएस) इ.द्वारे शहरी वाहतूक पायाभूत सुविधा सुरू करणे आणि विकसित करण्याची जबाबदारी  संबंधित राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांची आहे.

महाराष्ट्राकडून नाशिक शहरासाठी नाशिक मेट्रोनिओ प्रकल्पाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

विविध राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांकडून केंद्रीय आर्थिक सहाय्यासाठी प्राप्त झालेल्या मेट्रोलाईट  आणि मेट्रोनिओ प्रस्तावांचे तपशील राज्य आणि शहरानुसार खालीलप्रमाणे आहेत:

 

Sr No

State/UT

City

Name of Project

1

Delhi

Delhi

Rithala-Narela MetroLite Corridor in the remaining 03 corridors of Delhi Metro Phase-IV

2

Maharashtra

Nashik

Nashik MetroNeo

3

Jammu and Kashmir

Jammu

Jammu MetroLite

4

Srinagar

Srinagar MetroLite

5

Uttar Pradesh

Gorakhpur

Gorakhpur MetroLite

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री कौशल किशोर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

M.Chopade/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777349) Visitor Counter : 206


Read this release in: English , Telugu