रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून मौद्रीकरण

Posted On: 02 DEC 2021 5:44PM by PIB Mumbai

 

चालू आर्थिक वर्षात, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI)  इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) मोड अंतर्गत .7350 कोटी रुपये  सवलती मूल्य  आणि 495 कोटी रुपये भांडवली खर्चासह  390 किमीचे मुद्रीकरण केले आहे.   टोल ऑपरेट ट्रान्सफर (TOT) मोडद्वारे 3 टप्प्यात  450 किमीच्या अतिरिक्त लांबीसाठी देखील बोली लावण्यात आली.

मात्र, शासन निर्णयानुसार आरक्षित मूल्य जाहीर करता येत  नाही.

तसेचसुमारे 4,912 किमी लांबीचे 86 पट्टे निवडण्यात आले  आहेत.  प्रकल्प व्यवहार्यता आणि बोलीच्या वेळी प्रचलित असलेले बाजार मूल्याच्या आधारे  सरकारी नियमांनुसार प्राधान्यक्रम, मुद्रीकरणाची  पद्धत, अपेक्षित आगाऊ प्राप्त रक्कम आणि भांडवली खर्च निर्धारित केले जातील.

याशिवाय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) ने आर्थिक  वर्ष 2023 ते  2025 दरम्यान मुद्रीकरणासाठी राष्ट्रीय महामार्गाचे खालील पट्टे निवडले आहेत. :

 

Financial Year

Length (in Km)

2022-23

5,500

2023-24

7,300

2024-25

8,900

 

राष्ट्रीय महामार्ग  शुल्क नियमांनुसार  वापरकर्ता शुल्क आकारले जाते. व्यापार हक्क धारक  केवळ शुल्क  अधिसूचनेनुसार शुल्क वसूल करतात.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777327) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Tamil