संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांची नाशिक आणि देवळाली येथील स्कुल ऑफ आर्टिलरी , तोफखाना केंद्र (आर्टिलरी सेंटर) आणि लष्कराच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलला भेट

Posted On: 01 DEC 2021 7:31PM by PIB Mumbai

पुणे, 1 डिसेंबर 2021

लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी आज 1 डिसेंबर 21 रोजी नाशिक आणि देवळाली येथील प्रशिक्षण केंद्रांना भेट दिली. यावेळी नाशिक रोड येथील तोफखाना केंद्राचे (आर्टिलरी सेंटर) प्रमुख ब्रिगेडियर ए रागेश यांनी या केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या कोविड-19 प्रतिबंधक नियमांचे पालन करून सुरू असलेल्या प्रशिक्षण आणि प्रशासनविषयक उपक्रमांची त्यांना माहिती दिली. या केंद्रातील विविध प्रशिक्षण विभागामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षण अधिकाऱ्यांशी लष्कर कमांडरांनी संवाद साधला. अतिशय समर्पित वृत्तीने सर्व जण करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आणि या केंद्रातील प्रशिक्षणाचा उच्च दर्जा आणि प्रशासन व्यवस्था याबद्दल समाधान व्यक्त केले. अत्युच्च गुणवत्तेचा ध्यास घेऊन सदैव कार्यरत राहण्याची त्यांनी सर्व श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना सूचना केली.

लष्कराच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलला  दिलेल्या भेटीदरम्यान या संस्थेच्या प्रमुखांनी  संस्थेमधील प्रशिक्षणासह विविध पैलूंची आर्मी कमांडरांना माहिती दिली. यावेळी त्यांच्या हस्ते  उल्लेखनीय कामगिरी आणि कर्तव्याविषयीची समर्पित वृत्ती याबद्दल पात्र कर्मचाऱ्यांना प्रशंसा पत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. हवाई प्रशिक्षण तळावरील सर्व श्रेणीच्या अधिकाऱ्यांशी संवाद करून या भेटीची सांगता झाली. 

या दोन दिवसाच्या भेटीदरम्यान आर्मी कमांडरांनी स्कुल ऑफ आर्टिलरीला देखील भेट दिली आणि तेथील विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रशासनविषयक कामकाजाचा आढावा घेतला.

 

 

M.Iyengar/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1776947) अभ्यागत कक्ष : 252
Read this releasein: English