दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतातील स्टारलिंक सेवांच्या आगाऊ नोंदणीबाबत सूचना
Posted On:
01 DEC 2021 7:13PM by PIB Mumbai
मुंबई, 1 डिसेंबर 2021
असे निदर्शनास आले आहे की मेसर्स स्टारलिंकने भारतात उपग्रह आधारित स्टारलिंक इंटरनेट सेवांची आगाऊ नोंदणी सुरू केली आहे. स्टारलिंकच्या (www.starlink.com) संकेतस्थळावरुनही हेच स्पष्ट होते. त्यांच्यानुसार भारतीय प्रदेशातील वापरकर्त्यांद्वारे उपग्रह आधारित इंटरनेट सेवेची नोंदणी केली जाऊ शकते.
भारतात उपग्रह आधारित सेवा प्रदान करण्यासाठी, भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून विशिष्ट परवाना आवश्यक आहे. याद्वारे जनतेला कळविण्यात येते की, या कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर दावा केलेली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सादर करण्यासाठी कोणताही परवाना/अधिकृतता प्राप्त केलेली नाही.
त्यानुसार, सरकारने कंपनीला उपग्रह आधारित इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी भारतीय नियामक चौकटीचे पालन करण्यास सांगितले आहे आणि तात्काळ प्रभावाने भारतात उपग्रह इंटरनेट सेवेची नोंदणी टाळण्याचे सांगितले आहे.
स्टारलिंक हा परवानाधारक नसल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता, लोकांना सूचित केले जाते की जाहिरात केली जात असलेल्या स्टारलिंकच्या सेवांचे सदस्यत्व घेऊ नका.
M.Chopade/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776943)
Visitor Counter : 165