माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अभिनेत्री रविना टंडन यांची मुख्य भूमिका असलेली नेटफ्लिक्स वरील वेबसिरीज,'आरण्यक'चा 52 व्या इफ्फीमध्ये प्रीमियर शो
घरातील स्त्रीच्या पंखांखाली कुटुंब सुरक्षित असावं: रविना टंडन
पहिल्यांदाच, नेटफ्लिक्स वरील वेब सिरीजचा भारतातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर शो: सिद्धार्थ रॉय कपूर
पणजी, 26 नोव्हेंबर 2021
आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव असलेल्या इफ्फीच्या इतिहासात पहिल्यांदाच तसेच, नेटफ्लिक्ससाठीही हा पहिलाच प्रयोग, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि इफ्फीच्या सर्जनशील सहकार्यातून करण्यात आला. 'आरण्यक' या अभिनेत्री रविना टंडनची मुख्य भूमिका चित्रपट असलेल्या नेटफ्लिक्सच्या गुन्हेगारीवर आधारीत मालिकेचा(वेब सिरीज) आज 26 नोव्हेंबर 2021 रोजी प्रीमियर शो झाला. एका रहस्यमयी खुनाची ही गोष्ट आहे ज्यात गुंतागुंतीच्या राजकीय हिकमती, वैयक्तिक उद्देश आणि अमानवी घटना आहेत. यात प्रत्येक व्यक्ती संशयित आहे आणि सर्वांकडे काहींना काही गुपित आहे. इफ्फीला उपस्थित चित्रपट क्षेत्रातील प्रतिनिधींना, आज महोत्सवात या मालिकेचा पहिला भाग बघताना, या वेबसिरीजमधील रहस्ये उलगडतांना या थरारपटाचा भाग होण्याची संधी मिळाली.
आपल्या पुरुष पोलीस सहकाऱ्यायासोबत या खुनाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुख्य भूमिकेत असलेल्या रविना टंडन, दिग्दर्शक विनय वायकुल, सुद्धार्थ रॉय कपूर, चित्रपट निर्माते आणि व्यवस्थापकीय संचालक, रॉय कपूर फिल्म्स, रोहन सिप्पी, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक, रमेश सिप्पी एंटरटेनमेंट तसेच मोनिका शेरगिल, कंटेंट प्रमुख नेटफ्लिक्स इंडिया यांनी 'मेकिंग ऑफ आरण्यक' या विषयावर इफ्फीमध्ये आयोजित चर्चासत्रात आपले अनुभव कथन केले. रॉय कपूर फिल्म्स आणि सिप्पी एंटरटेनमेंट यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन यांनी कस्तुरी डोगरा, या प्रामाणिक पोलीस अधिकारी आणि प्रेमळ आई व पत्नीची भूमिका करण्यास प्रेरणा कशी मिळाली हे सांगितले. त्यांचे हे विलक्षण अनुभव ऐकतांना इफ्फी प्रतिनिधी त्यात अक्षरशः गुंगून गेले होते. "कस्तुरी एक कठोर, स्वतंत्र आणि अतिशय हुशार पोलीस अधिकारी आहे, जी आपलं काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करते असं त्यांनी सांगितलं. जर कुटुंबाने पूर्ण सहकार्य केलं आणि त्यांना शक्ती दिली, तर आपल्या समाजातील महिला मोठी उंची गाठू शकतात,असेही त्या म्हणाल्या.
दिग्दर्शक विनय वायकुल यांनी या गुन्हेगारी थरारपटाच्या दिग्दर्शनातील विशेष पैलूंवर प्रकाश टाकला.
सिद्धार्थ रॉय कपूर, व्यवस्थापकीय संचालक, रॉय कपूर फिल्म्स, आणि या मालिकेचे एक निर्माते, यांनी इफ्फी प्रतिनिधींना सांगितले की, नेटफ्लिक्सची वेब सिरीज भारतातील चित्रपट महोत्सवात दाखविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रोहन सिप्पी, संचालक, रमेश सिप्पी एंटरटेनमेंट, या मालिकेचे दुसरे निर्माते, यांनी सांगितले, मालिकेच्या नावाला एक रहस्यमय वलय आहे. "आरण्यक म्हणजे जंगली. यातून प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते."
आरण्यक खास ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी बनविण्यात आलेला अस्सल गुन्हेगारीपट आहे. आणि हा खास नेटफ्लिक्स पद्धतीचा गुन्हेगारीपट आहे असे, नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट प्रमुख मोनिका शेरगिल,यांनी सांगितले.
हा प्लेटफॉर्म, चित्रपट क्षेत्रात महिलांना पुढे आणण्यास कटिबद्ध आहे, असेही शेरगिल यांनी सांगितले. "महिला केंद्रित प्रकल्पांसाठी नेटफ्लिक्स पूर्णपणे कटिबद्ध आहे. नेटफ्लिक्समध्ये 50 टक्के अधिकारी महिला आहेत, आम्हाला बाबलिंगभाव विषयक बाबतीत असलेला पारंपरिक विचार बदलायचा आहे.
ऍमेझॉन, नेटफ्लिक्स, सोनी आणि इतर सर्व मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्स, इतिहासात पहिल्यांदाच, एखाद्या चित्रपट महोत्सवात खास मास्टरक्लासेस, कंटेंट प्रदर्शन आणि प्रिव्ह्यू, विशेष तयार केलेलं फिल्म पॅकेज, चित्रपट प्रदर्शन आणि विविध प्रत्यक्ष आणि आभासी कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775546)
Visitor Counter : 258