माहिती आणि प्रसारण मंत्रालय

“सनीची व्यक्तिरेखा अतिशय साधी आहे आणि त्यामुळेच ती साकारणे अतिशय कठीण झाले” : रंजित शंकर, 52 व्या इफ्फी च्या भारतीय पॅनोरमा विभागातील चित्रपट ‘सनी’च्या दिग्दर्शकांणी व्यक्त केल्या भावना


ओटीटी प्लॅटफॉर्म्स हे मल्टीप्लेक्सपेक्षा फार वेगळे नसतात, समांतर चित्रपटांचा संघर्ष सुरूच राहणार : 52 व्या इफ्फी मध्ये रंजित यांनी व्यक्त केले मत

Posted On: 26 NOV 2021 9:30PM by PIB Mumbai

पणजी, 26 नोव्‍हेंबर 2021 

 

आपलं सर्वस्व घालवून बसल्यावर, सनी, महामारीच्या काळात चोरट्या मार्गाने दुबईहून केरळला येतो आणि येत्या सात दिवसात आयुष्य संपवण्याचं ठरवून, समाजापासून लपून राहतो. चित्रपट प्रेमींना 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या अस्वस्थ माणसाच्या सात दिवसाच्या प्रवासाचे साक्षीदार होता आले आणि त्याच्यापुढे काय वाढून ठेवलं आहे हे बघता आले. यासाठी महोत्सवात ‘सनी’ या इंडियन पॅनोरमा चित्रपट विभगात मल्याळी चित्रपटामुळे हे शक्य झाले आहे.

चित्रपटाचे कथासार इफ्फीच्या प्रतिनिधींना समजावून सांगताना दिग्दर्शक रणजीत शंकर म्हणाले: “गेल्या वर्षी देशात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लागला तेव्हा आम्हाला ही कल्पना सुचली. जेव्हा हा चित्रपट बनविण्याचा निर्णय पक्का झाला, तेव्हा लगेच आम्ही चित्रिकरण सुरु केलं, कारण अशा प्रकारच्या गोष्टींत असलेला रस वेगाने कमी होत जातो.” शंकर आणि चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक शंकर शर्मा काल या महोत्सवात पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.

दिग्दर्शकांनी सांगितले की व्यक्तिरेखेच्या साधेपणामुळेच ती साकारणं अतिशय कठीण होतं. “हा एक-व्यक्तिरेखा असलेला  चित्रपट आहे. ही व्यक्तिरेखा अतिशय साधी आहे आणि त्यामुळेच ती साकारणं अतिशय कठीण झालं होतं.

“हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म वर अत्यंत यशस्वी ठरला आहे, अशी माहिती दिग्दर्शकाने दिली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देशभरात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे, असेही त्यांनी सांगितले.”

मात्र,  समांतर चित्रपटांच्या उद्देशासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म कितपत उपयुक्त ठरेल, याविषयी शंकर यांना अद्याप शंका वाटते. “ओटीटी प्लॅटफॉर्म हे मल्टिप्लेक्स पेक्षा फार काही वेगळे नाहीत,  तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म देखील, चित्रपटांची निवड करतांना देखील, ते मोठ्या नावांची निवड करतात. म्हणूनच, कदाचित समांतर किंवा धाटणीपेक्षा वेगळे असलेल्या चित्रपटांना पुढेही संघर्ष करावा लागेल, असे दिसते.” असे शंकर म्हणाले.

चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक, शंकर शर्मा यांनी यावेळी सांगितले की सनीच्या मनातले विचार,त्याच्या मनातील आंदोलने  संगीताच्या माध्यमातून पोचवण्यासाठी कसा प्रयत्न केला. चित्रपटात 90 टक्के संगीत बी स्केल मध्ये वापरण्यात आला आहे.

रंजित शंकर यांनी याआधी, ‘पॅसेंजर’ , ‘पुण्यालन अगरबत्तीज’, ‘वर्षम’, ‘प्रेथम’, भाग एक आणि दोन तसेच ‘कमला’  या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775460) Visitor Counter : 155


Read this release in: English , Urdu , Hindi