इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आधार 2.0 मुळे डिजिटल ओळख आणि स्मार्ट प्रशासनाचा नवयुगारंभ : 23-25 या कालावधीत कार्यशाळा
“आधार परिसंस्था प्रत्येक नागरिकाच्या सक्षमीकरणासाठी वाढीला चालना देत असून भारत लवकरच 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे”: राजीव चंद्रशेखर
Posted On:
25 NOV 2021 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 'आधार 2.0- डिजिटल ओळख आणि स्मार्ट प्रशासन कार्यशाळेच्या नव्या युगाचा प्रारंभ' या तीन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप समारंभाला संबोधित केले.
यावेळी राजीव चंद्रशेखर म्हणाले की आधार 2.0 कार्यशाळा ‘डिजिटल इंडिया’च्या भावनेला योग्य दिशा आणि आकार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना साकार करण्यासाठी उत्प्रेरक ठरेल. ते म्हणाले की आज तंत्रज्ञानामुळे शिक्षण, आरोग्य सेवा आणि शेतीसाठी चांगल्या सेवा उपलब्ध झाल्या असून पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यात मदत होत आहे . आपले मोबाईल प्रशासनाचे स्वप्न – मोबाईल फोनवर सेवा देणे आणि सर्वांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न आज साकार झाले आहे. आधार, यूपीआय आणि डिजी लॉकरसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी फेसलेस, कॅशलेस आणि पेपरलेस प्रशासन सुनिश्चित करत आहे . यातून मजबूत, भक्कम आणि सुरक्षित डिजिटल इंडियाचा पाया रचला आहे. आधार 2.0 कार्यशाळेदरम्यान झालेल्या चर्चेतून पुढील दशकासाठी नवीन धोरणे आणि रणनिती आखण्यासाठी मौल्यवान निष्कर्ष समोर आले आहेत, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या आर्थिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय म्हणाले की, ‘किमान सरकार कमाल शासन’ या मिशनला अनुसरून आधारने तळागाळात संघीय शासन व्यवस्थेची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. आधारने प्रशासन व्यवस्थेला अवजड दस्तावेज आणि अधिकार्यांबरोबर कंटाळवाणा संवादापासून मुक्ती देऊन विशिष्ट ओळख प्रणाली आणि दलाल रहित अत्याधुनिक डिजिटल व्यवहारांकडे नेले आहे. 2014 पासून ‘आधार’ अधिक मजबूत बनले आहे, विविध सरकारी कार्यक्रमांमध्ये त्याचा चांगल्या प्रकारे वापर होत आहे आणि आता 313 हून अधिक डीबीटी कल्याणकारी योजना लाभार्थ्यांना लक्ष्यित वितरण आणि अनुदान देण्यासाठी आधार मंचाचा वापर करत आहेत . मार्च 2020 पर्यंत सरकारी तिजोरीत 1800 अब्ज ( 1.80 लाख कोटी) रुपयांची बचत झाली आहे. .
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश साहनी म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) च्या विशिष्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करून ‘आधार’ सर्वसमावेशक बनवण्यासाठी विशिष्ट ओळख प्राधिकरण प्रयत्नशील आहे . यामुळे केवळ कार्यक्षम प्रभाव मूल्यांकन आणि डेटा विश्लेषण करण्यास मदत होईलच , शिवाय निधीच्या प्रवाहासाठी डिजिटल तपासणी देखील केली जाईल. कोविडच्या काळात आधारने तारणहार म्हणूनही काम केले आहे, अशी माहितीहीअशी माहितीही त्यांनी दिली. आधारचा वापर करून पुरवण्यात आलेल्या सेवा खालीलप्रमाणे आहेत:
नागरिकांकडून त्यांची ओळख पटवण्यासाठी आधारचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ऑनलाइन आधार प्रमाणीकरणाद्वारे विविध योजनांतर्गत सेवांचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये नागरिकांकडून सुमारे 1400 कोटी वेळा आधारचा वापर केला.
मार्च 2020 च्या तुलनेत एप्रिल 2020 मध्ये एपीबी पेमेंट (आधार-सक्षम DBT पेमेंट) मध्ये 140% पर्यंत वाढ झाली आहे. एप्रिल 2020 च्या तुलनेत मे 2021 मध्ये 200% पेक्षा जास्त वाढ झाली, जी कोविड काळात सरकारने थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिलेले पैसे दर्शवते.
विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गर्ग यांनी सांगितले की, एकेकाळी व्यक्तिशः केली जाणारी प्रक्रिया आता बोटांच्या टोकावर ऑनलाइन होत आहेत, शिवाय, ग्राहक देखील डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून आनंदी आहेत.
कार्यशाळेच्या समारोप सत्रात ‘ आधार हॅकेथॉन’ च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आणि राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते पुरस्कार आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
पत्त्याच्या अद्ययावतीकरणावरील पहिल्या क्रमांकाची संकल्पना म्हणून पुढील संघांना विजेते घोषित करण्यात आले.
Sl No
|
Team Identity
|
Participants
|
College
|
Rank
|
Prize Money
(in Rs.)
|
1
|
Team Uhtred
|
Kartik Bansal Adit Patel Aryamaan Pandey Ankit Hans Sagnik Biswas
|
SRM College, Chennai
|
1st
|
3 Lakh
|
2
|
cbxkznoia96
|
Varenya Tiwari Soumadip Das Pranav Nair
|
IIT Guwahati
|
2nd
|
2 Lakh
|
3
|
Code Impossible
|
IshantDahiyaMuditKhandelwalKshitijVikram Singh
|
NSUT, Delhi
|
3rd
|
1 Lakh
|
4
|
Null Pointer Exception
|
Arun R Charanya S Praveen V Aswin Antony Prince J
|
St Joseph College of Engineering, Chennai
|
3rd
|
1 Lakh
|
(b) For 2nd Theme Authentication Reimagined, following teams was declared as winners:-
Sl No
|
Team Identity
|
Participants
|
College
|
Rank
|
Prize Money
(in Rs.)
|
1
|
Tinker Child
|
Rutvik Gupta Shubham Gaur Abhishek Chaudhary Abhyam Gupta DeepanshLodhi
|
IIT Jammu
|
1st
|
3 Lakh
|
2
|
202 Accepted
|
AtharvaRajadhyakshaOmkarPrabhune
|
Vishwakarma Institute of Technology, Pune
|
2nd
|
2 Lakh
|
3
|
CaffinatedFast Finger
|
SmitalLunawatHamza Ansari Satyam Agrawal MrunaliniGaikwadAtharvaChandras
|
RamraoAdik Institute of Technology, Navi Mumbai
|
3rd
|
1 Lakh
|
4
|
Ctrl-Alt_Elite
|
Pranav MS Raksha S SamhithaSurajJawoor
|
KSIT, Bangalore
|
3rd
|
1 Lakh
|
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775119)
Visitor Counter : 267