भूविज्ञान मंत्रालय
‘वातावरण आणि हवामान संशोधन - निरीक्षण पद्धती व सेवांचे प्रारूप’ (ACROSS) या छत्र योजनेला 14 व्या वित्तीय आयोगापासून ते पुढील वित्तीय आयोगाच्या कार्यकाळापर्यंत ( 2021- 2026) मुदतवाढ देण्यास कॅबिनेट समितीची मंजुरी
ACROSS ला तिच्या 8 उप योजनांसह पुढील 5 वर्षांसाठी मिळालेल्या मुदतवाढीमुळे 2 हजार 135 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
Posted On:
24 NOV 2021 5:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2021
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार कॅबिनेट समितीने आज ‘वातावरण आणि हवामान संशोधन - निरीक्षण पद्धती व सेवांचे प्रारूप’ (ACROSS) या छत्र योजनेला तिच्या 8 उप योजनांसह पुढील पाच वर्षांच्या आर्थिक कालखंडासाठी ( 2021- 2026) मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली. यासाठी 2 हजार 135 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हि योजना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या पुढील विभागाद्वारे कार्यान्वित केली जाणार आहे - भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), मध्यम कालिक हवामान अंदाज राष्ट्रीय केंद्र (NCMRWF) , भारतीय वृत्तीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि भारतीय राष्ट्रीय सागरी माहिती सेवा (INCOIS).
तपशील :
ACROSS योजना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (MoES) वातावरणीय विज्ञान कार्यक्रमाशी संबंधित असून हवामानसंबंधित विविध सेवा देऊ करते.
उद्दिष्ट :
ACROSS च्या अंतर्गत असलेल्या 8 उप योजना विविध क्षेत्रांशी संबंधित असून त्या IMD , IITM , NCMRWF आणि INCOIS या संस्थांमार्फत राबवल्या जातील आणि हवामान संबंधित विविध पैलूंचा मागोवा घेतील. या प्रत्येक संस्थेला नेमून दिलेले काम करण्यासाठी खालील 8 योजना राबवल्या जातील.
1. पोलारिमेट्रिक डॉप्लर हवामान रडार्स (DWRs) चा वापर - IMD
2. हवामान अंदाजनाची पद्धती सुधारणे - IMD
3. हवामान सेवा - IMD
4. वातावरणीय निरीक्षण यंत्रणा - IMD
5. हवामानाचे अंकगणितीय प्रारूप विकसन - NCMRWF
6. मान्सून मिशन ३ - IITM / NCMRWF / INCOIS / IMD
7. मान्सून चे वहन , ढग आणि हवामानातील बदल (MC4) - IITM / NCMRWF /IMD
8. उच्च कार्यक्षम गणन यंत्रणा (HPCS) - IITM /NCMRWF
रोजगार निर्मिती क्षमतेसह इतर परिणाम -
माहिती जमा करण्यापासून अंदाज वर्तवण्यापर्यंतच्या या यंत्रणेला चालवण्यासाठी प्रत्येक पातळीवर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकेल.
पार्श्वभूमी -
जागतिक हवामान बदलामुळे आकस्मिकरित्या होणारे टोकाचे हवामान बदल वाढले असून त्यामधून निर्माण झालेल्या धोक्याकडे पाहता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने अनेक लक्ष्याधारित कार्यक्रम तयार केले आहेत. हे कार्यक्रम IMD , IITM , NCMRWF आणि INCOIS या संस्थांमार्फत राबवले जातील. म्हणूनच हे सर्व उपक्रम ACROSS च्या अंतर्गत एकाच छत्राखाली आणण्यात आले आहेत.
G.Chippalkatti/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774681)
Visitor Counter : 280
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Malayalam