संरक्षण मंत्रालय
सदर्न स्टार सॅपर्सने पुणे येथे 241 वा कॉर्प्स दिन साजरा केला
प्रविष्टि तिथि:
18 NOV 2021 5:13PM by PIB Mumbai
पुणे , 18 नोव्हेंबर 2021
कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्स किंवा सॅपर्स म्हणून ज्यांना सामान्यपणे ओळखले जाते, त्यांनी 241 वा कॉर्प्स दिन 18 नोव्हेंबर 2021 रोजी पुण्यातील सदर्न कमांड मुख्यालयात साजरा केला.

भारतीय सॅपर्सचा 18 व्या शतकाच्या मध्यापासूनचा मोठा इतिहास आहे. कॉर्प्स अधिकृतपणे त्यांची स्थापना 1780 मध्ये झाल्याचे मानतात जेव्हा कॉर्प्सचा सर्वात वरिष्ठ गट, मद्रास सॅपर्सची स्थपणा झाली. त्यानंतर बंगाल आणि बॉम्बे सॅपर्सची स्थापना झाली. नंतर 18 नोव्हेंबर 1932 रोजी या गटांचे विलीनीकरण करून कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सची स्थापना करण्यात आली.
कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्स डे निमित्त, लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, आर्मी कमांडर, सदर्न कमांड यांनी सॅपर समुदायाला शुभेच्छा दिल्या. कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्स भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व प्रकारे सज्ज राहतील आणि 'सर्वत्र' हे त्यांचे ब्रीदवाक्य खर्या अर्थाने कायम राखतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . राष्ट्रसेवेत आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिलेल्या कॉम्रेड्सच्या सन्मानार्थ सदर्न कमांड येथील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे एक पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यमान आणि माजी सॅपर्स उपस्थित होते .
अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1772962)
आगंतुक पटल : 315
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English