पोलाद मंत्रालय
मॉयलच्या कामगारांसाठी वेतन सुधारणेच्या त्रिपक्षीय समझोता वेतन करारावर स्वाक्षऱ्या
Posted On:
16 NOV 2021 10:27PM by PIB Mumbai
नागपूर, 16 नोव्हेंबर 2021
मॉयलच्या कामगारांसाठी वेतन सुधारणेच्या त्रिपक्षीय समझोता वेतन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मॉयल व्यवस्थापन, मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये भारत सरकारच्या मुख्य श्रम सचिवांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत श्रम शक्ती भवन येथे एका उच्चस्तरीय सोहळ्यात या करारावर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या.
01.08.2017 ते 31.07.2027 या दहा वर्षांसाठी ही वेतन सुधारणा असून त्याचा लाभ जवळपास 6,000 कंपनी कर्मचाऱ्यांनी होईल. ही वेतन सुधारणा मॉईल कामगार संघटन या मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या आणि मॉईल व्यवस्थापन यांच्यामधील समझोता करारावर आधारित आहे. या प्रस्तावात 20% फिटमेंट लाभ आणि 20% दराने लाभ/भत्ते समाविष्ट आहेत. कंपनीने अंतरिम मदत म्हणून मूलभूत आणि महागाई भत्त्याच्या 12% इतका दर मे,2019 पासून दिला आहे.
कामगारांची 1 ऑगस्ट 2017 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीतील देय थकबाकी कंपनी एकरकमी चुकती करेल. त्यामुळे कंपनीवर 218 कोटींचा भार पडेल. या प्रस्तावित वेतन सुधारणेचा आर्थिक बोजा वर्षाला 87 कोटी असेल. मॉईल लिमिटेडने या खर्चासाठी ताळेबंदात आगावू व्यवस्था केली आहे.
या करारपत्रावरील स्वाक्षऱ्यांनंतर 60 दिवसात अंमलबजावणी करणे बंधन कारक आहे.
या बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते.
मॉईल विषयीः मॉईल मर्यादित ही कंपनी म्हणजो भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या प्रशासकिय नियंत्रणाखालील मिनिरत्न स्तरावरील अनुसूचित- अ गटातील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. ही मँगेनिज खनिजाची देशातील प्रमुख उत्पादक कंपनी असून महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील 11 खाणींवर काम करते. मॉईलकडे देशातील 34 टक्के मँगेनिज उत्पादक खाणी असून देशातील एकूण उत्पादनाच्या 45 टक्के उत्पादन ती करते.
Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772433)
Visitor Counter : 250