माहिती आणि प्रसारण मंत्रालय

फिल्म्स डिव्हिजन आणि सीएफएसआयकडून बालदिन-2021 निमित्त अॅनिमेशन आणि माहितीपटांचे आयोजन

Posted On: 13 NOV 2021 5:04PM by PIB Mumbai

 

बालदिन 2021 च्या निमित्ताने, फिल्म्स डिव्हिजनने  चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी, इंडिया (सीएफएसआय) च्या सहकार्याने 14 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांच्या संकेतस्थळ  आणि यु ट्यूब  चॅनलवर चित्रपटांचे खास ऑनलाइन स्क्रीनिंग आयोजित केले  आहे. दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो.

बालदिनानिमित्त दाखवण्यात येणारे चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत-  स्कूल बेल (04 मि. /2020) – बालमजुरी निर्मूलनावरील पीएसए  लघुपट, बन्यान डीअर (9.18 मि. / 1959) – बौद्ध जातक कथेवर आधारित चित्रपट, दॅट टच ऑफ गोल्ड (2.22 मि./1966) ) -एक अॅनिमेटेड चित्रपट जो वर्षानुवर्षे जगभर प्रसिद्ध असलेल्या मिडास राजाच्या प्रसिद्ध कथेचे रूपांतर आहे, स्विमी (5.44 मि. / 1973) -हा चित्रपट मिस्टर लिओ लिओनी यांच्या "स्विमी" या पुस्तकावर आधारित असून एकतेची संकल्पना आहे. "अन एव्हरग्रीन स्टोरी (9.21 मि./1976) - एका पंचतंत्र कथेवर आधारितलहान मुलाचे रडणेएक उदात्त अंतकरण कसे  करू शकते  हे या चित्रपटात दाखवले आहे , 'द लायन अँड रॅबिट '  (8.37 मि. / 1974) - एक अॅनिमेशनपट आहे ज्यात  "यशस्वी होण्यासाठी मोठे आणि बलवान असण्याची गरज नाही, तुम्ही  फक्त हुशार असणे आवश्यक आहे" हे अधोरेखित केले आहेफ्रेंडशिप (8.41 मि./ 1990) - पंचतंत्र कथांपैकी  एका कथेवर  आधारित एक लहान अॅनिमेशनपट आहे , एक अनेक और एकता (7.06 मि/1977) - "एकत्र असलो तर आपण ताकदवान  आहोत, वेगळे झाल्यावर आपली ताकद कमी होते " या वाक्प्रचारावर ही  कथा आधारित असलेला अॅनिमेशन चित्रपट, याशिवाय  CFSI चे  सहा प्रशंसनीय बालपट -  तारू (19 मि / 1990), कठपुतली (14 मि / 2008), करुणा की विजय (12 मि / 1985), करामती कोट (90 मि. / 1996), पप्पू की पगदंडी (90 मि. / 2014) आणि गौरू -द जर्नी ऑफ करेज (124 मि. / 2016).

हे विशेष बालचित्रपट  www.filmsdivision.org/Documentary of the Week  आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision  वर 14 नोव्हेंबर 2021 रोजी 24  तास प्रसारित केले जातील.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771454) Visitor Counter : 201


Read this release in: English