अर्थ मंत्रालय

सनदी लेखापाल म्हणजे अर्थव्यवस्थेचे महत्वपूर्ण स्तंभ: डॉ. भागवत कराड


पुण्यात साधला सनदी लेखापालांशी संवाद

Posted On: 11 NOV 2021 7:37PM by PIB Mumbai

 

देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सनदी लेखपालांचा सहभाग महत्वाचा आहे. सनदी लेखापाल देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहेत. विकसित भारत घडवायचा तर अर्थव्यवस्था सक्षम हवी आणि त्या अर्थव्यवस्थेचे आपण स्तंभ आहात, अशा शब्दात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सनदी लेखापालांचा गौरव केला. तसेच देशामध्ये पुण्यात सर्वात अधिक सनदी लेखापाल असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया', पुणे शाखेच्या वतीने आयोजित संवाद भेट कार्यक्रमात डॉ. कराड बोलत होते.

देशातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते असायला हवे ते चालू स्थितीत हवे, अशा पंतप्रधानांच्या सूचना आहेत. जन-धन योजनेमुळे  या उद्दिष्टात मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. तरीसुद्धा आर्थिक साक्षरता विषयात मोठे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. याकरिता नाबार्डच्या सहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात एक वाहन देऊन आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभियानात सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केले.

भारत सरकार 'फॉर पीपल' या तत्वावर काम करत आहे. तुमच्या मदतीने देशाची अर्थव्यवस्था विकसित करायची आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेचे वैद्य असलेले सनदी लेखापाल मोठी भूमिका बजावू शकतात, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी 'आयसीएआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए निहार जांबुसरीया यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. आयसीएआय' पुणे शाखेचे अध्यक्ष सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष सीए काशीनाथ पठारे उपस्थित होते.

***

ShilpaN./M.Chopade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771037) Visitor Counter : 368


Read this release in: English