दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार विभाग मुंबई क्षेत्र यांच्यावतीने पीएम-वाणी (PM WANI) या विषयावर वेबिनार संपन्न
Posted On:
10 NOV 2021 9:23PM by PIB Mumbai
मुंबई दि . 10 नोव्हेंबर 20 21
दूरसंचार विभाग - मुंबई क्षेत्राने 10 नोव्हेंबर 2021 रोजी प्रधानमंत्री वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस (PM-WANI) या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले होते. दूरसंचार विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या पीएम-वाणी योजनेचा उद्देश पब्लिक डेटा ऑफिस एग्रीगेटर्स (PDOAs) द्वारे सार्वजनिक वाय-फाय सेवा प्रदान करणे आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवांच्या प्रसाराला गती देणे असा आहे. वेबिनारमध्ये इंटरनेट सेवा प्रदाते आणि संभाव्य पीडीओ (पब्लिक डेटा ऑफिस) चे प्रतिनिधी उपस्थित होते.
वेबिनारचे उद्घाटन अजय कमल, उपमहासंचालक (तंत्रज्ञान), दूरसंचार विभाग - मुंबई क्षेत्र यांच्या हस्ते झाले. डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी पीएम-वाणी योजनेमध्ये ब्रॉडबँड प्रसाराची अफाट क्षमता आहे. पीएम-वाणी फ्रेमवर्कच्या लाइट-टच रेग्युलेशनच्या आधारे, ते उद्योजकांना सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉट्स स्थापित करण्यास आणि स्वतःसाठी अतिरिक्त महसूल निर्माण करण्यास प्रोत्साहित करेल अशी माहिती कमल यांनी यावेळी दिली.
संजय सेठी, संचालक (तंत्रज्ञान), दूरसंचार विभाग - मुंबई क्षेत्र यांनी पीएम-वाणी फ्रेमवर्कचे विविध घटक जसे की सेन्ट्रल रजिस्ट्री, पीडीओ, पीडीओए आणि अॅप प्रदाते याबाबत माहिती दिली. पीएम-वाणी फ्रेमवर्क बद्दल संभाव्य पीडीओद्वारे उपस्थित केलेल्या शंकांचे दूरसंचार विभाग टीमने निरसन केले.
पीएम-वाणीबद्दल माहिती:
राष्ट्रीय डिजिटल कम्युनिकेशन अंतर्गत केंद्र सरकारने सन 2022 पर्यंत 10 दशलक्ष वाय-फाय हॉटस्पॉट्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि पीएम-वाणी योजना हे उद्दिष्ट सुकर करेल.
या सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क द्वारे ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही.
पीएम-वाणीद्वारे देशातील सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कचा प्रसार ब्रॉडबँड सेवांच्या प्रसाराला गती देईल आणि यामुळे स्थानिक उद्योजक जसे की चहावाला, किराणा स्टोअर्स आणि भोजनालयांना अतिरिक्त महसूल मिळवता येईल.
इच्छुक संभाव्य पीडीओ खालील लिंकवर अधिक चौकशी करू शकतात.: https://pmwani.cdot.in/wani/pdo.
दूरसंचार विभाग सर्व भागधारकांना पीएम-वाणीच्या अंमलबजावणी आणि प्रसारामध्ये मदत करेल.
***
Jaydevi PS/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770937)
Visitor Counter : 189