आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडील कोविड -19 प्रतिबंधक लसींबाबत अद्ययावत माहिती
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 116.58 कोटींपेक्षा अधिक मात्रा पुरविण्यात आल्या
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 15.77 कोटींपेक्षा अधिक शिल्लक मात्रा उपलब्ध
Posted On:
07 NOV 2021 9:13AM by PIB Mumbai
देशभरातल्या कोविड–19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरूवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.
देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करीत आहे. केंद्र सरकार कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 % लसींची खरेदी करेल, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा (मोफत) पुरवठा केला जाईल.
VACCINE DOSES
|
(As on 7th November 2021)
|
SUPPLIED
|
1,16,58,27,955
|
BALANCE AVAILABLE
|
15,77,70,771
|
केंद्र सरकारने आतापर्यंत 116 कोटी 58 लाखांपेक्षा जास्त (1,16,58,27,955) लसींच्या मात्रा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 15 कोटी 77 लाखांहून (15,77,70,771) अधिक न वापरलेल्या मात्रा अजूनही शिल्लक आहेत.
***
RadhikaA/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769831)
Visitor Counter : 225