संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एअर मार्शल संजीव कपूर, एव्हीएसएम, व्हीएम यांनी कमांडंट, एनडीए, खडकवासला   म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 01 NOV 2021 4:49PM by PIB Mumbai

 

एअर मार्शल संजीव कपूर, AVSM, VM यांनी लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम यांच्याकडून 31 ऑक्टोबर 21 रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय सैन्यात 39 वर्षे सेवा बजावल्यानंतर मिस्त्री  आज सेवानिवृत्त झाले.

एअर मार्शल संजीव कपूर, एव्हीएसएम, व्हीएम  डिसेंबर 1985 मध्ये भारतीय हवाई दलाच्या  फ्लाइंग ब्रँचमध्ये रुजू  झाले. विविध ट्रेनर, वाहतूक आणि महत्वपूर्ण सामरिक  विमानांवर 7800 तासांहून अधिक अपघातरहित उड्डाणाचा त्यांना अनुभव आहे.  ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी  (67 वी तुकडी  डी स्क्वाड्रन), डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, फ्लाइंग इंस्ट्रक्टर स्कूलकॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी  एम. एससी (संरक्षण अभ्यास), मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि एम. फिल  केले आहे.  ते  सध्या उस्मानिया विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.

त्यांनी भारतात आणि परदेशात असंख्य उड्डाण  सराव आणि मोहिमांमध्ये  भाग घेतला आहे. फ्लाइंग इंस्ट्रक्टर म्हणून त्यांनी  एअर फोर्स अकादमी आणि फिक्स्ड विंग ट्रेनिंग फ्लाइटयेलाहंका येथे काम केले आहे.  हाय अल्टिट्यूड, व्हीव्हीआयपी, एअर टू एअर रिफ्यूलिंग  आणि कॉम्बॅट ऑपरेशन्समधील त्यांच्या अफाट अनुभवामुळे त्यांनी अति उंचावरील प्रदेशातील  मोहिमांचे  नेतृत्व केले. ते भारतीय हवाई दलातील एरियल रिफ्यूलिंग ऑपरेशन्समधील एक अग्रणी आहेत ज्यांना ओईएम सह परदेशात प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याच्या कमांड  नियुक्तींमध्ये एअर टू एअर रिफ्यूलिंग स्क्वाड्रनची कमांड यांचा समावेश आहे. त्यांच्या नियुक्त्यांमध्ये हवाई मुख्यालयातील संचालक आणि प्रधान संचालक (ऑपरेशन्स)सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटमध्ये  विभाग प्रमुख आणि वरिष्ठ हवाई दल प्रशिक्षक, हवाई दलाचे सहाय्यक प्रमुख (परिवहन  आणि हेलिकॉप्टर) आणि असिस्टंट चीफ ऑफ द स्टाफ यांचा समावेश आहे. कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांना वायु सेना पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1768531) Visitor Counter : 178


Read this release in: English