आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या उपलब्धतेबाबत अद्ययावत माहिती


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 112 कोटीं लसीच्या मात्रा केल्या उपलब्ध

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 13 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयोगी मात्रा शिल्लक

Posted On: 31 OCT 2021 9:16AM by PIB Mumbai

देशभरातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे जेणेकरुन ते लसीकरणाचे अधिक उत्तम नियोजन करु शकतील आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.

देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. केंद्र सरकार कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 टक्के लसींची खरेदी करेल, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना त्याचा मोफत पुरवठा केला जाईल.

VACCINE DOSES

 

(As on 31st October 2021)

 

SUPPLIED

 

1,11,98,78,225

 

BALANCE AVAILABLE

 

 

13,00,66,651

केंद्र सरकारने आतापर्यंत  सुमारे 112 कोटी  (1,11,98,78,225)  लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.

 

 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे  13 कोटी  (13,00,66,651)  न वापरलेल्या मात्रा  अजूनही शिल्लक आहेत.

 ***

MC/Sushma/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1768080) Visitor Counter : 197