अर्थ मंत्रालय
ठाणे सीजीएसटीने 90.68 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणूक प्रकरणी एकाला अटक
Posted On:
23 OCT 2021 6:36PM by PIB Mumbai
बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC) लाभ घेणाऱ्या आणि ते वापरणाऱ्या घोटाळेबाजांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या एका मोठ्या मोहिमेत मुंबई सीजीएसटी विभागाच्या ठाणे सेंट्रल जीएसटी आयुक्तालयाने एका सूत्रधाराला अटक केली आहे. त्याने मेसर्स दोशी मार्केटिंग कंपनी सुरु केली होती आणि भाईंदर पश्चिम येथून या कंपनीचे कामकाज पाहत होता. त्याने सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून कोणतीही वस्तू किंवा सेवा न मिळवता 90.68 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून त्याचा गैरवापर केला आहे.
त्याची कंपनी एस्बेस्टोस, सुती धागे, शिवणकामाचा धागा इत्यादींचा व्यापार करत होती आणि मालाची 503.80 कोटी रुपये किंमत दाखवून फसवणूक करून इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला होता. प्रत्यक्षात माल न पुरवता आणि ई- वे बिल न भरता हा केवळ एका कागदावरचा व्यवहार होता.
यातील प्रमुख आरोपीला सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींखाली अटक करण्यात आली असून ठाण्याच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 5 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे .
आणखी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये भाईंदर परिसरात कार्यरत त्रिमूर्ती जेम्स आणि निकिता ट्रेडिंग अँड कंपनी या दोन कंपन्यांचा 292 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्यात सहभाग असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपन्या सक्रिय नव्हत्या आणि त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली होती. या प्रकरणातील सूत्रधारांनाही पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अधिक तपास सुरू आहे.
***
R.Aghor/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765993)
Visitor Counter : 234