आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        कोविड-19 प्रतिबंधक लसीची राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील उपलब्धतेची अद्ययावत माहिती
                    
                    
                        
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 104.5 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रा केल्या उपलब्ध
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 11.65 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या मात्रा शिल्लक
                    
                
                
                    Posted On:
                22 OCT 2021 9:34AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                देशभरातल्या कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरूवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल.
देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करीत आहे. केंद्र सरकार कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75% लसींची खरेदी करून , राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा (मोफत) पुरवठा करत आहे.
 
	
		
			| 
			   
			VACCINE DOSES 
			 | 
			
			   
			(As on 22ndOctober 2021) 
			 | 
		
		
			| 
			   
			SUPPLIED 
			 | 
			
			   
			1,04,58,46,415 
			 | 
		
		
			| 
			   
			BALANCE AVAILABLE 
			  
			 | 
			
			   
			11,65,54,028 
			 | 
		
	
 
 
केंद्र सरकारने आतापर्यंत 104.5 कोटींपेक्षा जास्त (1,04,58,46,415) लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत पध्दतीने) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अशा सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 11.65 कोटी (11,65,54,028) कोविड लसींच्या न वापरलेल्या उपयोगी मात्रा अजूनही शिल्लक आहेत.
***
 
SonalT/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1765688)
                Visitor Counter : 195