आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 प्रतिबंधक लसीची राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील उपलब्धतेची अद्ययावत माहिती


राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 102 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रा केल्या उपलब्ध

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 10.42 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या मात्रा शिल्लक

प्रविष्टि तिथि: 19 OCT 2021 9:42AM by PIB Mumbai

देशभरातल्या कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरूवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखता येईल. 

 

देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करीत आहे. केंद्र सरकार कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 % लसींची खरेदी करेल, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा (मोफत) पुरवठा केला जाईल.

 

VACCINE DOSES

 

(As on 19th October 2021)

 

SUPPLIED

 

1,02,05,09,915

 

BALANCE AVAILABLE

 

 

10,42,38,220

 


केंद्र सरकारने आतापर्यंत 102 कोटींपेक्षा जास्त (1,02,05,09,915) लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मोफत आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 10.42 कोटी (10,42,38,220) न वापरलेल्या उपयोगी मात्रा अजूनही शिल्लक आहेत.


***

STupe/SampadaP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1764852) आगंतुक पटल : 242
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Gujarati , Tamil , Telugu