दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दूरसंचार विभागाच्या महाराष्ट्र विभागाकडून सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षा या विषयावर विशेष वेबिनारचे आयोजन


सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षेसाठी सरकार आणि बॅंकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक –आर. के. चौधरी

Posted On: 14 OCT 2021 7:28PM by PIB Mumbai

पुणे,  14 ऑक्टोबर 2021

दूरसंचार विभागाच्या महाराष्ट्र विभागाने, ‘सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षितता’ या विषयावरएक जनजागृती वेबिनार आयोजित केले होते. आर के चौधरी, आयटीएस, एमएच एलएसए प्रमुख, दूरसंचार विभाग यांच्या अध्यक्षतेखाली 14 ऑक्टोबर 2021 रोजी हे वेबिनार घेण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून दूरसंचार विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना सायबर गुन्हे विषयावर जागरूक करण्यासाठी या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. एम एच एलएसए चे प्रमुख, आर. के. चौधरी यांनी यां वेबिनारचे उद्‌घाटन केले.

आपल्या उद्‌घाटनपर भाषणात चौधरी यांनी, वाढते सायबर गुन्हे आणि त्यांचे वैश्विक स्वरूप या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेत वाढ करण्यावर भर दिला. ग्राहकांनी आपल्या सुरक्षेसाठी इंटरनेट वापरताना जास्त सतर्कता बाळगणे आणि सरकार तसेच बँकांच्या सूचनांचे कसोशीने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. असे संगितले.

एम एच एलएसए, पुणे विभाग संचालक विनय व्ही जम्भाली यांनी या विषयावर सादरीकरण केले. या सत्रात सायबर विश्वाची प्रचंड व्याप्ती तसेच सायबर गुन्हे आणि या विरोधातील अस्तित्वात असलेले आणि विकसित होत जाणारे कायदे याविषयी विवेचन करण्यात आले. यात आयटी कायदा, 2000 आणि त्यात 2008 साली करण्यात आलेल्या सुधारणा, भारतीय दंड विधानातील सुधारणा, पुरावा कायदा (Evidence Act) यांचा समावेश होता. या सत्रात विविध प्रकारच्या वित्तीय सायबर फसवणुकीचे गुन्हे आणि त्याविषयी बाळगायची सावधगिरी याविषयी देखील माहिती देण्यात आली. यात विशेषतः विविध प्रकारचे आर्थिक गुन्हे, ते टाळण्यासाठी बाळगायची सावधगिरी आणि ताकार नोंदविण्याच्या विविध पद्धती याबद्दलची माहिती उपस्थितांना उपयोगाची ठरली. आभार प्रदर्शनाने सत्राची सांगता झाली.

M.Iyengar/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1764001) Visitor Counter : 341


Read this release in: English